जेथे लोजपचे उमेदवार नाहीत तेथे भाजपला मतदान करा, पासवान यांचे आवाहन  - Where there are no LJP candidates, vote for BJP, Paswan's appeal | Politics Marathi News - Sarkarnama

जेथे लोजपचे उमेदवार नाहीत तेथे भाजपला मतदान करा, पासवान यांचे आवाहन 

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आज बिहारमधील सर्वच वर्तमानपत्रात भाजपने जाहीरात दिली आहे. या जाहीरातीत नितीशकुमारांचा चेहरा नाही.

पाटणा : ज्या ठिकाणी लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) उमेदवार नाहीत तेथे भाजपच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन लोजपचे नेते चिराग पासवान यांनी आज केले आहे. 

मतदान अगदी तीन दिवस बाकी राहिले असतानाच पासवान हे मुख्यमंत्री नितीशकुमारांवर जोरदार हल्ला चढवित आहे. पासवान यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये जेडीयूला म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमारांना लक्ष्य केले आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा दिसत असून नितीशकुमारांचा चेहराही गायब झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आज बिहारमधील सर्वच वर्तमानपत्रात भाजपने जाहीरात दिली आहे. या जाहीरातीत नितीशकुमारांचा चेहरा नाही. केवळ केवळ म्हणजे मोदी आणि भाजपलाच दाखविले आहे. या जाहीरातीवरूनही पासवान यांनी नितीशकुमारांवरांवर टीका केली. 

पासवान म्हणाले, की नीतीश आणि नीतशमुक्त सरकार असे अभियान आपल्या पक्षातर्फे राबविले जात आहे त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.सर्वांना मी आवाहन करतो, की लोजपचे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना निवडूण द्या आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत तेथे भाजपचा प्रचार करा आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान करा. 

पासवान यांच्या जेथे जेथे सभा झाल्या आहेत तेथे त्यांनी नितीशकुमार यांचे सरकार उखडून फेकून द्या. कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देऊ नका असे सांगत हल्लाबोल करीत आहेत. राज्यात जेथे जेथे जेडीयूचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी पासवान यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

याचाच अर्थ असा आहे की भाजपचे उमेदवार अधिक कसे निवडून येतील याची काळजी ते घेत आहेत. तर जेडीयूचा पाडाव कसा होईल याची व्यूहरचना ते आखत आहेत. पासवान यांच्या पक्ष खरेच जेडीयूला धूळ चारेल का याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, भाजपला अधिक जागा मिळाल्या आणि जेडीयू कमी मिळाल्या तरी नितीशकुमारचं मुख्यमंत्री होती असे भाजपचे झाडूनपुसून नेते सांगत आहेत.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख