शाळा कधी सुरू होणार? केंद्र सरकार म्हणतंय...

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि AIMMS यांनी नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिध्द केले आहे.
When should school reopening in India Central government answered
When should school reopening in India Central government answered

नवी दिल्ली : कोरोना लाटेमुळं मागील वर्षीपासून शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. कोरोनाचा कहर कमी होत असला तरी देशभरातील दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. यावर केंद्र सरकारकडून आज स्पष्टीकरण देण्यात आलं. (When should school reopening in India Central government answered) 

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॅाल (V. K. Paul) यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अधिकाधिक शिक्षकांचे लसीकरण आणि मुलांमध्ये संसर्गाचा परिणाम याबाबत शास्त्रीय अभ्यास झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा विचार केला जाईल. ही वेळ लवकरच येऊ शकते. पण परदेशामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर संसर्ग वाढल्याने लगेच बंद कराव्या लागल्या होत्या, हेही पाहायला हवे. विद्यार्थी आणि शिक्षकांना आपण या परिस्थितीत धोक्यात ढकलू शकत नाही, असे पॅाल यांनी स्पष्ट केलं.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि  AIMMS यांनी नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिध्द केले आहे. यामध्ये 18 वर्षाखालील मुलांमध्येही कोरोनाच्या अँटीबॅाडी विकसित आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये देशातील मुलांवर कोरोना संसर्गाचा अधिक परिणाम होणार नाही, असे सर्वेक्षणात म्हटलं आहे. पण याचा अर्थ शाळा सुरू केल्या जातील, असा नाही असे पॅाल यांनी सांगितले. 

'अनेक गोष्टी अशी आहेत, ज्याबद्दल आपल्या काहीच माहिती नाही. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचाही विचार करावा लागेल. विषाणूमध्ये होणाऱ्या बदलांचाही विचार करावा लागेल. सध्याचा विषाणू मुलांमध्ये अधिक परिणामकारक ठरत नाही. पण त्यामध्ये बदल झाल्यास काय करणार?,' अशी भीतीही पॅाल यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असेल, अशी भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारकडून त्यासाठी तयारी केली जात आहे. तसेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर बनली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com