शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसची कोंडी! कपिल सिब्बल पडले तोंडघशी - What was the ideology when Congress aligned with Shiv Sena says Jitin Prasad | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसची कोंडी! कपिल सिब्बल पडले तोंडघशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवला आहे.

नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवला आहे. या आघाडीला काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांनी विरोध केला होता. दोन टोकाच्या विचारधारेचे पक्ष एकत्र आल्याने भाजपनेही काँग्रेसवर जोरदार टीका केली. आता हीच आघाडी काँग्रेसची कोंडी करू लागली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल तोंडघशी पडले. (What was the ideology when Congress aligned with Shiv Sena says Jitin Prasad)

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस (Congress)  नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी देशातील राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले होते की, मी पक्षाच्या नेतृत्वाने काय केले आणि काय केले नाही यावर बोलत बसणार नाही, आपण भारतीय राजकारणाच्या अशा एका टप्प्यावर पोचलो आहोत जिथे निर्णय हे केवळ विचारधारेच्या आधारावर होत नाहीत. या राजकारणाला मी प्रसाद राम राजकारण आहे, असे म्हणेन.

हेही वाचा : कर्नाटकात येडियुरप्पांची खुर्ची बळकट; प्रदेशाध्यक्ष बदलही टळला

आधी आयाराम आणि गयाराम होते. हे आपण पश्चिल बंगालमध्ये पाहिले. भाजप जिंकणार असे वाटल्याने मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल झाले. आताच्या निवडणुका या तुमच्या विचारधारेच्या आधारावर लढल्या जात नाहीत. तुम्हाला त्या पक्षात जाऊन व्यक्तिगत स्वरुपाचा काय फायदा होईल या आधारावर निर्णय घेतले जातात. हे आधी मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात घडले होते, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले. 

सिब्बल यांनी विचारधारेवरून केलेल्या टीकेला प्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेशी केलेल्या आघाडीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, सिब्बल खुप ज्येष्ठ नेते आहेत. कोणतीही विचारधार नसते. केवळ देशहित हीच विचारधार आहे. शिवसेनेशी आघाडी करताना काँग्रेसची कोणची विचारधारा होती. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करताना कोणती विचारधारा होती. त्याचवेळी ते केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात लढत होते. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीवर बोलल्याने काँग्रेसचे भविष्य बदलणार नाही, असा टोला प्रसाद यांनी लगावला.

दरम्यान, राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख