पोलिसांच्या सपोर्टसाठी #westandwithmumbaipolice .. असाही ट्रेंड सुरू 

पोलिसाच्या विरोधात #ShameOnMumbaiPolice चे कॅपन सुरू आहे. तर मुंबई पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी #westandwithmumbaipolice असा ट्रेंडही सध्या टि्वटरवर सुरू आहे.
1sushant_singh.jpg
1sushant_singh.jpg

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागत आहे. सुशांतची आत्महत्या झाल्यानंतर 40 दिवसात मुंबई पोलिसांनी काहीही तपास केला नाही. या प्रकरणाबाबत आता मुंबई पोलिसांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तपासात मुंबई पोलिस दुलर्क्ष करीत असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

सोशल मीडियावर नेटिझन्सनी मुंबई पोलिसांवर निशाना साधला आहे. सध्या सोशल मीडियावर मुंबई पोलिसाच्या विरोधात  #ShameOnMumbaiPolice चे कॅपन सुरू आहे. तर मुंबई पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी #westandwithmumbaipolice असा ट्रेंडही सध्या टि्वटरवर सुरू आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर 40 दिवसात मुंबई पोलिसांनी काहीही तपास केला नाही. ते जाणिवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सोशल मीडियामधून केला जात आहे. पोलिसांनी बॅालिवुडच्या माफियासमोर शरणागती पत्करली असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला जात आहे.  #ShameOnMumbaiPolice या कॅपनमध्ये आतापर्यंत  20 हजारांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. दोषींवर कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड सोशल मीडियामधून उठवली जात आहेत. तर पोलिसांना सपोर्ट कऱण्यासाठी काही नेटकऱ्यांनी #westandwithmumbaipolice .. असाही ट्रेंड सुरू केला आहे.    

काही दिवसापूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला होता. याबाबत कंगना हिने टि्वटकरून पोलिसांवर टिका केली होती. यात कंगना हिने म्हटले होते की अचानक मुंबई पोलिसांनी सुशांतला मानसिक रूग्ण कसे ठरविले. एका मनोवैज्ञानिकांने सांगितले होते की सुशांत कधी कधी भेटत होता. आपल्याकडे काय पुरावा आहे. सुशांतची वैद्यकीय इतिहास जनतेसमोर आणणे हे कायद्याच्या विरोधात आहे, असे कंगना हिने म्हटले होते.  


अभिनेता सुशांत सिंह रजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी दररोज विविध खुलासे होत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हिने नुकतेच मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाबाबत माहिती दिली. सुशांत आणि अभिनेत्री रिया चक्रवती यांचे नातेसंबध चांगले नव्हते. रिया ही सुशांतचा मानसिक छळ करीत असे, असा आरोप अंकिता लोंखडे हिने केला. अंकिता हिने आपले म्हणणे पुरावेनिशी पोलिसांकडे सादर केले आहे. अंकिता याबाबत सुशांतचे व्हाटस्अॅप चॅटिंगचे स्क्रीनशॅाटस् अंकिताने पोलिसांना दाखविले आहेत. एका वृत्तवाहिनेने याबाबतची माहिती दिली आहे. 

सुशांतच्या कुंटुबियांनी गेल्या फेब्रुवारीत याबाबत बांद्रा पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. बिहार पोलिसांनी अंकिताशी संपर्क साधला असता अंकिताने सांगितले की 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रमोशनाच्या दिवशी सुशांतने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठविला होता. या शुभेच्छा दिल्यानंतर काही दिवस सुशांत आणि अंकिता यांच्यात चित्रपटावरून चर्चा झाली होती. या दरम्यान सुशांत खूप भावूक झाला होता. रिया सोबतच्या रिलेशनशीपबाबत तो खूप तणावाखाली होती. हे रिलेशनशीप तो संपविण्याच्या मार्गावर होता. सुशांतने सांगितले की रिया त्याला खूप त्रास देत होती, असे अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले. 


Edited  by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com