ममतादीदींचे सल्लागार प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजपने दहा जागा जिंकल्या तर...टि्वटर सोडणार' 

ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी टि्वट करून आज मोठी घोषणा केली आहे.
2prashant_kishor_narendra_mo.jpg
2prashant_kishor_narendra_mo.jpg

कोलकता : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी काल भव्य रोड शो काढला. या वेळी तृणमूल काँग्रेससह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. तृणमूलकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शाह यांनी केला. 'आम्ही बंगालमध्ये सत्ता मिळवणारच..' असे शहा यांनी सांगितले आहे.  

कालच्या अमित शहा यांच्या रॅली आणि भाजपला पश्चिम बंगालमध्ये किती जागा मिळतील, यांच्यावरून ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी टि्वट करून आज मोठी घोषणा केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये अमित शहा म्हणतात, "प्रसारमाध्यमातील विशिष्ट वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आपल्याला आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा..जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन."

“पश्चिम बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आली आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाला एक रणनीतीकार गमवावा लागेल,” असा टोला भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत लगावला आहे.

शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये दौऱ्याच्या सुरवातीलाच बंगालच्या राजकारणात वादळ निर्माण केले. त्यांनी एक खासदार, 11 आमदार आणि एक माजी खासदार एवढे नेते एकाच वेळी फोडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मिदनापूर येथील जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसचे बडे नेते व आमदार सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यावरुन मागील काही दिवसांपासून मोठा गदारोळ सुरू होता. 

शहांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शांतीनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली. या वेळी त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहिली. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना शहा यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील रोड शोसाठी रवाना झाले.

बोलपूर येथील रोड शो वेळी बोलताना शहा म्हणाले की, बंगालमध्ये राजकीय हिंसाचार टोकाला पोचला आहे. भाजपच्या तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. मात्र, या प्रकरणांच्या तपासात अद्यापपर्यंत प्रगती झालेली नाही. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे भाजपला आपण रोखू शकतो हा तृणमूल नेत्यांचा भ्रम आहे. आम्ही बंगालमध्ये सत्ता मिळवणारच. 

तृणमूलचे अनेक बडे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस दुबळा होताना दिसत आहे. भाजपमध्ये आज झालेले 'मेगा इनकमिंग' हे शहांच्या रणनीतीचा भाग असून, आगामी काळात विरोधी पक्षांचे भाजपमध्ये येताना दिसतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com