#West Bengal Election : काँग्रेस 92 जागा लढविणार... - West Bengal Election Congress to contest 92 seats | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

#West Bengal Election : काँग्रेस 92 जागा लढविणार...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस 92 जागा लढविणार असल्याचे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चैाधरी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस 92 जागा लढविणार असल्याचे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चैाधरी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या चर्चेतून उद्यापर्यंत यावर निर्णय होणार आहे, असे चैाधरी यांनी सांगितले.  

2016च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षासोबत आघाडी केली होती. यात ज्या जागांवर काँग्रेसने जिंकल्या होत्या, त्या ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या जागा काँग्रेस लढविणार आहेत, मुर्शिदाबाद, मालदा, आणि दिनाजपूर येथील जागा काँग्रेस लढविणार असल्याचे चैाधरी यांनी सांगितले. 

अधीर रंजन चैाधरी म्हणाले, "बंगालमध्ये काँग्रेस, टीएमसी आणि भाजप यांच्यात लढत आहे. टीमसीच्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. आमचे अनेक कार्यक्रते कारागृहात आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपच्या हिंसक प्रवृत्ती, नकारात्मक वातावरणाला जनता कंटाळली आहे." 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार
निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला
आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे. ता. 2 मे रोजी
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.  

निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी, माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केला आहे. तृणमूलचे प्रमुख विरोधी काँग्रेस आणि डावे पक्ष राज्यात कमकुवत झाले आहेत. 

सध्याचे पक्षीय बलाबल
तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

हेही वाचा : बंगाली अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश.. 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अनेक चित्रपट कलाकार राजकारणात प्रवेश करीत आहेत. बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्राबंती चटर्जी हीने हाती कमळ धरत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत श्राबंती चटर्जीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येत्या विधानसभेसाठी श्राबंती ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.आता भाजपप्रवेशानंतर तिला विधानसभेचं तिकीट मिळणार, की ती स्टार प्रचारक होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चैंपियन' (Champion) मध्ये तिची प्रमुख भूमिका होती. 'डान्स बांगला डान्स' या रिअॅलिटी शोचं तिनं परीक्षण केलं आहे. चॅम्पियन, भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात ती झळकली आहे. तिनं आतापर्यंत 15 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख