पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डाव्यांचा सुपडा साफ - In West Bengal, the Congress, the Left suffered a major defeat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डाव्यांचा सुपडा साफ

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

पश्चीम बंगालच्या विधानसभा नवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे.

नवी दिल्ली : पश्चीम बंगालच्या विधानसभा नवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०९ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला २०१६ च्या निवडणुकीत ७० जागा मिळालेल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ते फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष यांचा मोठा पराभव झाला आहे.   

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लाट कायम आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, तृणमूलने निर्णायक आघाडी घेल्यामुळे हा अंदाज फोल ठरतांना दिसत आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकत पणाला लावली होती. त्यासाठी भाजपने अनेक खासदारांनाही विधानसभा नवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मागील २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे वोट शेअर ४४.९ टक्के होता तर भाजपचा १०.२ टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला ३७.९ टक्के मते मिळाली होती तर इतरांच्या खात्यात ७ टक्के मते होती.

बेळगावात मोठी उलथापालथ: काँग्रेसचे जारकीहोळी ९ हजार मतांनी आघाडीवर

२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया २६ जागा तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १ जागा मिळाली होती. भारतीय जनता पक्षाला फक्त ३ जागांवर विजय मिळाला होता. ९ जागा इतर पक्षांना मिळाल्या होत्या.

यामुळे कुंभमेळा अन् भारतातील निवडणुकांवर बोलणार नाही ; अदर पूनावालांची भूमिका 

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार असल्याचे सुरुतीच्या कलामध्ये दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख