ममतादीदींनी केलं धाडस अन् पडता-पडता वाचल्या...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
West Bengal CM Mamata Banerjee nearly falls while driving an electric scooter
West Bengal CM Mamata Banerjee nearly falls while driving an electric scooter

कोलकता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच इंधन दरवाढीची भर पडली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी गुरूवारी ई-स्कूटरवरून प्रवास केला. यादरम्यान त्यांनी स्कूटर चालविण्याचे धाडस केले पण तोल सांभाळता न आल्याने त्या पडता पडता वाचल्या. 

ममता बॅनर्जी यांनी काल अनोख्या पध्दतीने इंधन दरवाढीचा निषेध केला. त्यांनी कार्यालत जाण्यासाठी ई-स्कूटरवरून प्रवास करत जनतेला इंधन दरवाढीचे चटके बसत असल्याचे सांगितले. त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिरहाद हकीम हे सुरूवातीला स्कूटर चालवत होते. तर गळ्यात इंधन दरवाढीविरोधातील फलक अडकवलेल्या मुख्यमंत्री मागे बसल्या होत्या. 

पण काही अंतर गेल्यानंतर ममतादीदींनी स्कूटर चालविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी स्कूटरचा ताबा घेतला. तोल गेल्याने त्या एका बाजूला झुकल्या. पण सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सहकाऱ्यांनी स्कूटरला हात दिल्यानंतर त्यांनी काही अंतर स्कूटर चालविली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या संपूर्ण प्रवासाचे ममता सोशल मिडियावरही थटे प्रक्षेपण केले जात होते. 

दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमधील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. ममतादीदींच्या सत्ता उलथविण्यासाठी त्यांनी परिवर्तन यात्रा, सोनार बांगला अभियान असे विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. सोनाल बांगला अंतर्गत जनतेकडून बंगालच्या विकासासाठी सूचना घेतल्या जाणार आहेत. ही मोहिम 3 ते 20 मार्चदरम्यान राबविली जाणार आहे. 

तर ममता बॅनर्जी यांनी जय बांगलाचा नारा दिला आहे. भाजपला केवळ निवडणुरताच सोनाल बांगला आठवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्या जोरदार टीका करत आहे. एका सभेमध्ये त्यांनी मोदींनी दंगलखोर व धंदेबाज म्हटले. बंगालमध्ये तर भाजपचा पराभव होईलच पण केंद्रातूनही त्यांची सत्ता जाईल, असा दावाही त्यांनी केला. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com