ममतादीदींचा पलटवार, आता बास करा, भाजप जिंकलेल्या ठिकाणीच हिंसाचार सुरूय!  

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Mamata Banerjee .jpg
Mamata Banerjee .jpg

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्यानंतर बॅनर्जी यांनी बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. (West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticizes BJP)

ममता बॅनर्जी म्हणाल्या की,  ''अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजप जिंकले आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ सुरु आहे. भारतीय जनता पक्ष जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे, त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केले आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे,'' अशा शब्दात त्यांनी भाजपवर (BJP) हल्ला चढवला आहे. 

बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी, यासाठी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या शपथविधीनंतर राज्यपाल जगदीप धनखार यांनी ममता यांचे अभिनंदन केले. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की ''निवडणूक निकालानंतर उसळेला भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तत्काळ पावले उचलतील. या परिस्थितीत माझी छोटी बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान व कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल.'' 

राज्यपालांच्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले. त्यांनी राज्यपालांच्या हातातील माईक घेत संवाद साधला. त्या म्हणाल्या, ''मी आज शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य निवडणूक आयोगाच्या हाती होते. आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. या परिस्थितीत आपण कामाला सुरुवात करत आहोत.'' 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com