काटे की टक्कर : पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूलमध्ये पहिल्या ट्रेडमध्ये १० जागांचा फरक 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
 Narendra Modi, Mamata Banerjee .jpg
Narendra Modi, Mamata Banerjee .jpg

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८  वाजेपासून मत मोजणी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरु आहे. पोस्टल मतमोजनीचे कल हाती येत आहेत. त्यामध्ये तृणमूल काँग्रेस ६२ आणि भाजप ५४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २ आणि डावे पक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. 

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता.  

पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. दोन ठिकाणी निवडणूक झालेली नाही. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे.

जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पहावे लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २४९ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे. 

ओपिनियन पोल ममतांच्या बाजूने 
निवडणुकीआधी जाहीर झालेल्या टाईम्स नाऊ-सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार (जनमत चाचणी) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवेल. भाजपने तृणमूलमधील अनेक नेत्यांना फोडून पक्षाला खिंडार पाडले होते. याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होईल. राज्यात भाजपच्या जागा वाढतील. मात्र, सत्तेपासून भाजप दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण 294 जागांपैकी 211 जागा मिळाल्या होत्या. या वेळी पक्षाला 154 जागा मिळतील आणि पक्षाला बहुमत मिळेल. भाजपला मागील निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजपला 107 मिळतील. जागा वाढूनही भाजपला राज्यातील सत्तास्थापनेचे स्वप्न साकार करता येणार नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com