'यास'ची चाहूल; ममतादीदी मंत्रालयात रात्र जागून काढणार...पहा वादळी वारे, पावसाचे व्हिडिओ - West Bengal and Odisha witnesses strong wind and heavy rain ahead of cyclone yaas | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

'यास'ची चाहूल; ममतादीदी मंत्रालयात रात्र जागून काढणार...पहा वादळी वारे, पावसाचे व्हिडिओ

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 मे 2021

बंगालच्या उपसागरात तयार झालेले यास चक्रीवादळ भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कोलकता : पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीवर यास चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. या भागात वादळी वारे वाहण्यास आणि पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं प्रशासनही सतर्क झाले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रात्रभर मंत्रालयातच थांबणार आहेत. वादळाच्या स्थितीवर सतत लक्ष्य देत त्या प्रशासनाला सुचना देणार आहेत. (West Bengal and Odisha witnesses strong wind and heavy rain ahead of cyclone yaas)

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेले यास (Yaas) चक्रीवादळ भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे वादळ बुधवारी दुपारी बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बंगालमध्ये मदतीसाठी सुमारे ५४ हजार अधिकारी व कर्मचारी, दोन लाख पोलिस व होमगार्ड यांच्यासह NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यास संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मी रात्रभर मंत्रालयातच थांबून स्थितीचा आढावा घेणार आहे, असे ममतादीदींनी सांगितले. 

हेही वाचा : शशी थरूर यांना भारतीय व्हेरियंट भोवणार; खासदारकी रद्द करण्याची भाजपची मागणी

यास चक्रीवादळ वेगाने पश्चिम बंगाल व ओडिशाच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा  सामना करण्यासाठी केंद्र सरकारसह दोन्ही राज्यांकडून उपाययोजना केल्या जात आहे. पुढील बारा तासांत हे वादळ रौद्र रुप धारण करणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी दुपारी हे वादळ किनारपट्टीवर धडक देण्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच कालावधीत अम्फानने पश्चिम बंगाल (West Bengal) व ओडिशामध्ये (Odisha) हाहाकार उडवला होता. जवळपास शंभर जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यास चक्रीवादळही दोन्ही राज्यांत थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांसह बिहार, छत्तीसगढ या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यास च्रकीवादळ पुढील बारा तासात रौद्र रुप धारण करेल. मागील सहा तासांपासून हे वादळ ताशी नऊ किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. याच वेगाने हे वादळ पुढे सरकत राहणार असून अधिक भयंकर होत जाईल. बुधवारी सकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहचेल. तर दुपारी किनारपट्टी पार करेल. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी एवढा असेल. वादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीला धडकण्याच्या कालावधीत वाऱ्यांचा वेग ताशी १८५ किमी असण्याची शक्यता आहे.   

२० लाख नागरिकांना हलवलं

वादळाचा फटका लाखो लोकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागील आठवडाभरात वीस लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादळात एकही मृत्यू होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे म्हटले आहे. 

समुद्रात चार मीटर उंचीचा लाटा

यास चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या दिवशी समुद्रात भरती आहे. चक्रीवादळ येण्याचा कालावधी आणि भरती कालावधी एकच असल्याने दोन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. किनारपट्टीलगत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहेत. किनारपट्टीलगतच्या भागात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर घुसण्याची शक्यता असल्याने लगतचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख