आम्ही १५ ऑगस्ट साजरा केला अन् आठवडाभर कॉलेजलाच गेलो नाही... - We celebrated 15th August and didn't go to college for a week | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही १५ ऑगस्ट साजरा केला अन् आठवडाभर कॉलेजलाच गेलो नाही...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पुर्ण झाला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पुर्ण झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि आपले दिर्घ राजकीय अनुभव सांगितले. यावेळी बोलताना आझाद भावुक झाले होते. 

जम्मू प्रदेशातून आलेल्या आझाद यांनी सांगितले की त्यांचा महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांचे विचार वाचून देशभक्ती शिकलो आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणी राजीव गांधी यांचे आभार मानत गुलाम नबी म्हणाले की, त्यांच्यामुळेच मी येथे पोहोचू शकलो. काश्मीरची परिस्थिती पूर्वी कशी होती आणि आता किती बदल झाला हे त्यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानबद्दल आपले मत व्यक्त केले. 

आझाद म्हणाले की, मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या एसपी महाविद्यालयात शिकत होतो. तेथे १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट दोन्ही साजरे करण्यात येत होते. १४ ऑगस्ट ( पाकिस्तानचा स्वातंत्र दिन) साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझ्य काही सहकाऱ्यांनी  १५ ऑगस्ट साजरा केला तिथे फार कमी लोक होते. आम्ही त्यानंतर एका आठवडभर महाविद्यालयात गेलो नाही. कारण तेथे मारहाण होत होती. तो काळ आणि आजचा काळ यामध्ये खूप बदल झाला आहे. 

हे ही वाचा...

आझादांना निरोप देताना पंतप्रधान मोदी झाले भावुक 

यशवंतराव चव्हाणांसारखी आत्मियता केंद्र सरकारकडे नाही....

आझाद म्हणाले, मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे जे कधीच पाकिस्तानात गेले नव्हते, तेथे कशा प्रकारची परिस्थिती आहे. याचा विचार केला तर मला अभिमान वाटतो की, आपण हिंदुस्तानी मुसलमान आहे. जगातील कोणत्या मुसलमानाने अभिमान बाळगला पाहिजे, तर तो भारतातील मुस्लिमांनी बाळगला पाहिजे. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत, मुस्लिम देश एकमेकांशी भांडून संपत आहेत. तेथे कोणीही हिंदू किंवा ख्रिश्चन नाही, ते आपापसात भांडत आहेत. पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत, खुदाने त्या आमच्या मुस्लिमांमध्ये कधीही येऊ देऊ नये, असे आझाद म्हणाले. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर मी प्रथम सोपोरमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेथून तीन वेळा गिलानी साहेब आमदार निवडून गेले. त्या बैठकीत मी म्हणालो होतो की, जर माझ्या सरकारमधील मंत्र्याने धर्म किंवा मशिदी किंवा पक्षाच्या आधारे न्याय केला, तर मला त्यांची लाज वाटेल, असे आझाद यांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख