नेहरुंच्या १९४७ मधील भाषणामुळेच देशाची अर्थव्यवस्था बिघडली!  

काँग्रेस वाढते इंधनदर आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन आंदोलन करत आहे.
 Vishwas Sarangi says Pandit Jawaharlal Nehru's speech in 1947 ruined the country's economy .jpg
Vishwas Sarangi says Pandit Jawaharlal Nehru's speech in 1947 ruined the country's economy .jpg

भोपाळ : भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असे वक्तव्य भाजप नेते आणि मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग (vishwas sarang) यांनी केले आहे. पहिले पंतप्रधान व त्यांच्या पक्षाने अर्थव्यवस्था जर योग्य स्थितीत ठेवली असती, तर आज महागाई नियंत्रणात असती असे सारंग यांनी म्हटले आहे. विश्वास सारंगी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Vishwas Sarangi says Pandit Jawaharlal Nehru's speech in 1947 ruined the country's economy) 

काँग्रेस वाढते इंधनदर आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन आंदोलन करत आहे. त्याविषयी सारंग यांनी म्हटले की, ''देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते नेहरु कुटुंबाला द्यावे लागेल''. एक किंवा दोन दिवसात महागाई वाढत नाही. तसेच अर्थव्यवस्थेचा पायाही एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच अर्थव्यवस्था खालावली आहे,'' असे सारंग यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खसे तर सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. नेहरुंनी त्याकडेच दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला. '' आपली ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून नेहरुंनी या क्षेत्राची चिंताच केली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर आणि टिकणारी होती मात्र, नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली,'' असेही सारंगी म्हणाले. सध्याच्या स्थितीसाठी नेहरुंची चुकीची धोरणे जबाबदार आहेत, औद्योगीकरण ठीक होत, पण शेती त्याचा मूळ आधार असणे गरजेचे होते, असे सारंगी म्हणाले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी टीकेला उत्तर दिले आहे. '' मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रीमंडळातील विश्वास सारंग महागाईसाठी नेहरुंच्या १९४७ मधील भाषणाला जबाबदार धरत आहेत, ज्यावेळी त्यांचा जन्मही झाला नव्हता. आरोग्यमंत्री म्हणून नेहरुच कोरोनामुळे झालेल्या हजारो मृत्यू, बेड्सची कमतरता, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा यासाठी जबाबदार होते म्हणणार का?,'' असा सवाल त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com