हिंसाचार...तृणमूल काँग्रेसचे शेवटचे अस्त्र ! - Violence is TMC's last weapon, 'politics of violence' will end on May 2: Kailash Vijayvargiya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

हिंसाचार...तृणमूल काँग्रेसचे शेवटचे अस्त्र !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

हिंसाचार हे तृणमूल काँग्रेसचे शेवटचे अस्त्र आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सोमवारी केली. हिसांचाराचे राजकारण येत्या 2 मे रोजी संपुष्टात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 27 मार्चपासून सुरूवात झाली. 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसते. ही निवडणूक एका प्रकारची प्रतिष्ठेची लढाई मानली जात असून भाजप व तृणमूलच्या नेत्यांची एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू झाल्याचे दिसते. हिंसाचार हे तृणमूल काँग्रेसचे शेवटचे अस्त्र आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सोमवारी केली. हिसांचाराचे राजकारण येत्या 2 मे रोजी संपुष्टात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

विजयवर्गीय पुढे बोलताना म्हणाले, बंगालमध्ये इतिहासात शेवटचा हिंसाचार असेल आणि तो तृणणूल घडवून आणेल. परंतु, सत्तेची समीकरणे 2 मे रोजी बदलतील व भाजपची सत्ता आल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचार पुन्हा कधीही होणार नसून शांती नांदेल. केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 पैकी 26 जागांवर भाजप विजयी होईल, या वक्तव्याबाबत विजयवर्गीय म्हणाले की, भाजप सर्वच्या सर्व 30 जागांवर विजयी झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. 

बनावट मतदानापासून व बूथवर कब्जा करण्यापासून तृणमूलला जनतेने रोखले असून परिणामी जनतेने निवडीनुसार मतदान केले आहे, असाच त्याचा अर्थ होतो. भाजपच्याच पारड्यात मतदान टाकण्यात आले आहे, असाही त्याचा अर्थ होतो. तसेच तृणमूलचे गुंडही निवडणूक केंद्रांवर गडबड घडवून आणण्यात आतापर्यंत अयशस्वी ठरले असून त्याचे सारे श्रेय जनतेलाच जाते, असेही विजयवर्गीय म्हणाले. तृणमूलच्या खासदार नुसरत जहा एका रॅलीदरम्यान आक्रमक झाल्याच्या प्रकाराबाबत मात्र विजयवर्गीय यांनी बोलण्याचे टाळले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (ता. 27) पहिल्या टप्प्यात 79.79 टक्के लोकांनी मतदान केल्याची आकडेवारी समोर आली. एकूण 294 जागांसाठी मतदान होत असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होईल तर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख