सप, बसप, भाजपसोबत होते विकास दुबेचे संबध...

विकास दुबे याचा गुन्हेगारी जगात दबदबा होताच... पण त्याला राजकीय क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करायचा होता. देशातील अनेक नेत्यांसोबत विकास दुबे याची उठबस असायची.
3Vikas_20Dubey.
3Vikas_20Dubey.

लखनौ : आठ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबे याचा शोध उत्तरप्रदेश सरकार घेत आहे. विकास दुबे याचा गुन्हेगारी जगात दबदबा होताच... पण त्याला राजकीय क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करायचा होता. देशातील अनेक नेत्यांसोबत विकास दुबे याची उठबस असायची. याबाबत विकासच्या आईने सविस्तर माहिती पोलिसांनी सांगितली आहे. विकास हा पंचवीस वर्षापासून विविध राजकीय पक्षामध्ये सक्रीय होता. विकास हा 15 वर्ष बहुजन समाज पक्ष, 5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि 5 वर्ष समाजवादी पक्षात होता. त्याचा सर्व पक्षात वावर असल्यामुळे त्याच्याविरोधात बोलण्यास कोणताही पक्ष पुढे येत नाही, या पक्षाना याबाबत संकोच वाटत आहे.  


दोन दिवस उलटून गेल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारची बारा पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या पथकांनी शंभरहून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत. पण याठिकाणांहून पोलिसांना रिकाम्या हाती यावे लागले. विकास दुबे याचा एक साथीदार दया शंकर अग्निहोत्री सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला कल्याणपूर येथून पोलिसांनी पकडले आहे. आता विकास दुबे पोलिसांच्या हाती कधी लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याबाबतचे वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे. 
 

विकास दुबेला पोलिसांचा छापा पडणार ही माहिती खुद्द पोलिस ठाण्यातूनच फोनद्वारे मिळाल्याची धक्कादायक माहिती त्याच्या साथीदाराने पोलिसांना दिली आहे. दया शंकर अग्निहोत्री असे या साथीदाराचे नाव असून त्याला आज सकाळी पकडण्यात आले आहे. विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना कानपूर येथे २ जुलैला रात्री घडली होती.

यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल ६०  गुन्हे दाखल आहेत. दुबेचा जो साथीदार आज पकडला गेला, त्याच्यावर २५ हजार रुपयांचे ईनाम लावण्यात आले होते. 

आज सकाळी पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी उलट गोळीबार करुन त्याला निःशस्त्र केले व ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक बंदूक व जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिस अटक करण्यासाठी येत आहेत, ही माहिती देणारा दूरध्वनी विकास दुबेला पोलिस ठाण्यातूनच आला होता.

ही टीप मिळाल्यानंतर त्याने आपले २५-३० साथीदार गोळा केले व पकडायला आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. विकास दुबेला पकडून देणाऱ्यास किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे ईनाम जाहीर करण्यात आले होते. दुबेने व त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची हत्या केल्यानंतर हे ईनाम एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात येत असून बँक खालीही सील करण्यात येत आहेत. त्याच्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्याची काही वाहने जप्त केली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com