विकास दुबेचा एन्काऊंटर फेक नसल्याचा न्यायालयाचा निर्वाळा...उत्तर प्रदेश पोलिसांना क्लिन चीट.. 

विकास दुबेएन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
Sarkarnama Banner (71).jpg
Sarkarnama Banner (71).jpg

लखनऊ : कुविख्यात गुन्हेगार विकास दुबेच्या एन्काऊंटप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश पोलिसांना क्लिन चीट दिले आहे. विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती बी.एस. चैाहान समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात पोलिसांना क्लिन चीट दिले आहे. 

समितीने आठ महिने या प्रकरणाचा तपास केला. यात समितीला तपासादरम्यान पोलिसांनी दुबेचा एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा बनावट एन्काऊंटर असल्याचे तपासात आढळलेले नाही, तसेच कोणताही साक्षीदार सापडलेला नाही, असे समितीने नमूद केलं आहे. हा एन्काऊंटर बनावट असल्याचा एकही सबळ पुरावा समितीकडे नसल्याने पोलिसांना क्लिन चीट मिळाली आहे.   

उत्तर प्रदेशात ८ पोलिसांची हत्या करुन फरारी झालेला व उज्जैनमध्ये पकडला गेलेला गँगस्टर विकास दुबे कानपूरजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला होता. उज्जैनहून त्याला घेऊन येणाऱ्या पोलिस वाहनांच्या ताफ्यातली एक मोटार उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केले.  विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दहा पथके तयार केली होती. 

आठ दिवसांतील अनेक घडामोडींनंतर विकास दुबे अखेर मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती लागला होता. एका पोलिसाचे पिस्तुल हिसकावून विकास दुबेने पळण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com