आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला अटक...

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून आज सकाळी अटक करण्यात आली.
2vikas_dubey.
2vikas_dubey.

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून आज सकाळी अटक करण्यात आली. त्याच्यावर पाच लाखाचे इनाम लावण्यात आले होते. विकास दुबे हा उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकाने त्याला ओळखले.  

सुरक्षारक्षकाने पोलिसांना याबाबत कळविले. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला तेथून अटक केली आहे. कानपूर येथील चैाबेपूर येथे त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला होता. यात एका पोलिस उपअधिक्षकासह आठ जण ठार झाले होते.  आज सकाळीच त्याच्या दोन साथीदारांचा पोलिसांनी एनकांउटर केला होता. 

कानपूर आणि इटावा येथे हे दोन एनकाऊंटर झाले. कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एनकाऊंटरमध्ये दुबे याचा साथीदार प्रभात मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे. त्याला बुधवारी फरीदाबाद येथून अटक केली होती. कानपूर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी त्याला कानपूर येथे आणले जात होते. यावेळी पोलिसांची गाडी पंक्चर झाली होती.

पोलिस ही गाडी ठिक करीत असताना त्त्यावेळी त्याने पळून जाण्यासाठी पोलिसावर हल्ला केला.  प्रभात मिश्रा याला पोलिसांची रिवॅाल्वर हिसकावून पोलिसांवर गोळिबार करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्याला गोळी लागली. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान उत्तरप्रदेश पोलिसांनी दुसरा एनकाउंटर इटावा येथे केला. यात विकास दुबे याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. 

विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना कानपूर येथे २ जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल ६०  गुन्हे दाखल आहेत 
  

विकास दुबेला पकडून देणाऱ्यास किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात येत असून बँक खातीही सील करण्यात येत आहेत. त्याच्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्याची काही वाहने जप्त केली आहेत. विकास हा पंचवीस वर्षापासून विविध राजकीय पक्षामध्ये सक्रीय होता.

विकास हा 15 वर्ष बहुजन समाज पक्ष, 5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि 5 वर्ष समाजवादी पक्षात होता त्याचा सर्व पक्षात वावर असल्यामुळे त्याच्याविरोधात बोलण्यास कोणताही पक्ष पुढे येत नाही या पक्षाना याबाबत संकोच वाटत आहे.  त्याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारची बारा पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या पथकांनी शंभरहून अधिक ठिकाणी छापे मारले होते.

editing by - mangesh mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com