संघाचे प्रांत प्रचारक ते मुख्यमंत्री.. तीरथसिंह रावत आज शपथ घेणार..

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यशैलीत तयार झालेल्या तीरथसिंह यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
tirath singh rawat10.jpg
tirath singh rawat10.jpg

नवी दिल्ली : उत्तराखंड येथील पैाडी गढवाल लोकसभा मतदार संघाचे खासदार तीरथसिंह रावत यांची आज सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेण्याची शक्यता आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून आता तीरथसिंह रावत हे विराजमान होणार आहेत. भाजपच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यशैलीत तयार झालेल्या तीरथसिंह यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. गावापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास हा विधानसभा, संसदेपर्यंत पोहचला आहे. आता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडणार आहे. 

तीरथसिंह हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कट्टर कार्यक्रते असून महत्वाकांक्षी, सहनशील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरवात केली. सुरवातीला विद्यार्थी नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर उत्तरप्रदेशातील राजकारणात ते सक्रीय झाले. उत्तराखंडच्या स्थापनेनंतर ते येथील राजकारणात सक्रीय झाले.   

उत्तराखंड येथील पैाडी जिल्ह्यातील सीरों या लहानशा गावात त्यांचा जन्म 9 एप्रिल 1964 रोजी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव कलम सिंह तर आईचं नाव गैारी देवी आहे. विद्यार्थी जीवनातच ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघात सहभागी झाले. वयाच्या विसाव्या वर्षी 1983 मध्ये संघाने त्यांच्यावर प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली. 1988 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांना दोन महिन्याचा कारावास झाला होता. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीत झालेल्या आंदोलनात तीरथसिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

तीरथसिंह रावत यांनी गढ़वाल विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदवी घेतली असून पत्रकारितेची पदविका त्यांनी पूर्ण केली आहे. 1992 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांच्यावर अभाविपचे प्रदेश संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर ते प्रदेश उपाध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य होते.  

1997 मध्ये यांची उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांच्यानंतर उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर 2000 मध्ये तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे पहिले शिक्षणमंत्री झाले. 2007 मध्ये ते भाजप प्रदेश महामंत्री, प्रदेश सदस्य प्रमुख होते. 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक भाजप नेत्याचा पराभव झाला होता. पण तीरथसिंह रावत चौबट्टाखाल येथून आमदार म्हणून निवडून आले. 

तीरथसिंह हे दुसऱ्यांदा जेव्हा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा पक्षाने त्यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी टाकली. ते 2013 मध्ये भाजपप्रदेश अध्यक्ष झाले. 2019च्या निवडणुकीत ते पैाडी गढवाल लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांनी बीएस खंडूरी यांचे चिंरजीव मनीष खंडूरी यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. खासदार म्हणून त्यांची कारर्कीद उल्लेखनीय आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी मोठी जबाबदारी तीरथसिंह रावत यांच्यावर आहे.   

Edited  by :  Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com