राहुल गांधींनंतर आज तृणमूलच्या नेत्यांना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की

हाथरस येथील बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना अडविण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारने दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. काल राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर आज उत्तर प्रदेश पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे
Uttar Pradesh Police Roughed Trinamool Leadert on the way to Hathras
Uttar Pradesh Police Roughed Trinamool Leadert on the way to Hathras

लखनौ : हाथरस येथील बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना अडविण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारने दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. काल राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर आज उत्तर प्रदेश पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. 

हाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केले. या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली व नंतर अटक केली. 

त्यानंतर आज तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. ''आम्ही पिडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे ब्लाऊज ओढले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे,'' असे तृणमूलच्या नेत्या ममता ठाकूर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना जमीनीवर पाडले. ते यात जखमी झाले असावेत. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे तृणमूल नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले. 

दरम्यान, ''उत्तर प्रदेशात दोन दिवसांत बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या. यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री काही बोलत नाहीत. पंतप्रधानांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जर योगी सरकारला महिलांची सुरक्षा सांभाळणे जमत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com