उत्तरप्रदेशच्या शिक्षणमंत्री कमल रानी वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू  - Uttar Pradesh Education Minister Kamal Rani Varun dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तरप्रदेशच्या शिक्षणमंत्री कमल रानी वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू 

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कमल रानी वरूण यांना काही दिवसापूर्वी ताप आला होता. त्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता.

लखनैा : उत्तरप्रदेशच्या शिक्षणमंत्री कमल रानी वरूण यांचा कोरोनामुळे आज सकाळी मृत्यू झाला आहे. राज्यमंत्री कमल रानी वरूण यांना काही दिवसापूर्वी ताप आला होता. त्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लखनैा येथे उपचार सुरू होता. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या कानपूरमधील घाटमपूर येथून भाजपच्या आमदार म्हणून निवडणूक आल्या होत्या. 

लखनैाच्या सरकारी रूग्णालयाचे संचालक डॅा. डी. एस. नेगी यांनी सांगितले की  कमल रानी वरूण या कोरोना पॅाझिटिव्ह होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या व्हेटिलेटरवर होत्या. रविवारी सकाळी त्यांची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कमल रानी वरूण यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वटरवरून दुःख व्यक्त केले आहे. आपल्या टि्वटमध्ये ते म्हणतात की उत्तर प्रदेश सरकारमधील माझी सहयोगी राज्यमंत्री कमल रानी वरूण यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्या कुंटुबियांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देईल. 

उत्तरप्रदेश काँग्रेसने आपल्या टि्वटवरून कमल रानी वरूण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शनिवारी खासदार अमर सिंह यांच्या निधनानंतर कमल रानी वरूण यांनी त्यांना टि्वटवरून श्रद्धांजली वाहिली होती.  उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.सर्वसामान्य जनतेसह अनेक नेता, अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फे मोती सिंह यांच्यासह चेतन चैाहान, आरोग्यमंत्री डॅा. धर्म सिंह सैनी, क्रीडामंत्री उपेंद्र त्रिवारी उर्फे रघुराज सिंह हे कोरोना पॅाझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यातील राजेंद्र प्रताप हे कोरोनामुक्त झाले आहेत. 
Edited  by : Mangesh Mahale 

 हेही वाचा : जयाप्रदा म्हणतात, ''अमरसिंह माझे राजकीय गॉडफादर होते..''

मुंबई : राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे काल सिंगापूर येथे निधन झाले. बॅालिवुडमधील अनेक कलाकारांशी अमर सिंह यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. बिग बी अमिताभ बच्चन यांनी काल त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेत्री जयाप्रदा यांनी टि्वटरवरून अमर सिंह यांच्याबाबत एक पोस्ट फोटोसह शेअर केली आहे. त्यात जयाप्रदा म्हणतात की अमर सिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर खूप दुःखी झाले. 

जयाप्रदा टि्वटमध्ये म्हणतात, ''राज्यसभेचे खासदार अमर सिंह हे फक्त राजकीय व्यक्ती नव्हते तर ते सामाजिक काम करणारे व्यक्तीही होते. ते दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख समजतं असतं. भारतीय राजकारणात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. अमर सिंह माझे राजकीय गुरू आणि गॅाडफादर होते. माझ्या दुःखात त्यांनी मला नेहमीच मदत केली. समाज सेवा करण्यासाठी मला प्रेरित केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख