योगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात.. - uttar pradesh assembly elections congress priyanka gandhi front cm yogi adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

योगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

"सबको देखा बार बार, अबकी बार काँग्रेस सरकार " अशी काँग्रेसची घोषणा असेल.

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकची काँग्रेसने रणनीती ठरविली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी या निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत. उत्तरप्रदेशात प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर काँग्रेस निवडणूक लढवेल, असा निर्णय झाल्याच्या वृत्ताला पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी दुजोरा दिला आहे.  "उत्तरप्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल.." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. uttar pradesh assembly elections congress priyanka gandhi front cm yogi adityanath

"सबको देखा बार बार, अबकी बार काँग्रेस सरकार " अशी काँग्रेसची घोषणा असेल. विधानसभा निवडणुक काँग्रेसने ब्राह्मण कार्ड खेळण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर नाराज असलेल्यांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी देण्याची योजना करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते राजेश त्रिपाठी, प्रमोद तिवारी, आचार्य प्रमोद कृष्णन यांच्यावर ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांनी सोपवली आहे. 

दुसरीकडे भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जितीन प्रसाद यांनीही ब्राह्मण मतदारांना भाजपकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे समजते. उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक ही राममंदिर आणि हिंदुत्व या दोन विषयावर भाजप लढणार आहे, त्यामुळे  साधुच्या विरोधात साधु अशा लढतीसाठी  काँग्रेसने प्रमोद कृष्णन यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.  

नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरली असल्याचे एका पाहणीत आढळले आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टतर्फे केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे. जगभरातील नेत्यांचे अॅप्रूव्हल रेटिंग ट्रॅक डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्ट ही रिसर्च कंपनी करीत असते.  गेल्या वर्षींच्या तुलनेत मोदींची लोकप्रियता घसरली असल्याचे दिसून आले आहे. या वर्षींच्या पाहणीत नरेंद्र मोदी यांचे यांचे ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग ६६ टक्के आहे.यापूर्वी (२०१९) च्या पाहणीत मोदींचे रेटिंग ८२ टक्के होते. गेल्यावेळेच्या तुलनेत मोदींची लोकप्रियतेत घसरण झाली असली तरी मोदी जगातील अन्य देशांच्या नेत्यांपेक्षा लोकप्रियतेत आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदी हे तेरा देशांच्या नेत्यांमध्ये आघाडी आहे.  
 Edited by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख