Corona Alert : कुटूंबाला वाचवायचंय, मग आता घरातही घाला मास्क

कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा वेग अधिक असल्याने अनेक कुटूंब बाधित होत असल्याचे समोर आले आहे.
Use Mask in home also says niti ayog member v k paul
Use Mask in home also says niti ayog member v k paul

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरूच आहे. या लाटेमध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा वेग अधिक असल्याने अनेक कुटूंब बाधित होत असल्याचे समोर आले आहे. घरातील एकाला संसर्ग झाल्यानंतर कुटूंबातील इतर सदस्यही बाधित होत आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. 

देशात दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पण सध्या हा संसर्ग वाढतच चालला आहे. मास्कचा वापर, सतत हात धुवणे आणि शारीरिक अंतर या तीन महत्वाच्या गोष्टींवर भर देणे आवश्यक असल्याचे सातत्याने सांगितले जाते. पण कुटूंबातील अनेक सदस्य कोरोनाला बळी पडत असल्याने आता घरातही मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

नीती आयोगातील आरोग्य मंत्रालयाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी आज पत्रकार परिषदेत देशवासियांना आवाहन केले आहे. ते म्हणाले. आता घरामध्येही मास्क घालण्याची वेळ आली आहे. पाहुण्यांना देखील घरी बोलावू नका कोरोनाबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये. असे झाल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली आहे. 

शारीरिक अंतर न पाळणारी एखादी व्यक्ती ३० दिवसांमध्ये ४०६ लोकांना बाधित करू शकते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. घरगुती विलगीकरणामध्ये बाधित व्यक्तीने मास्क घातला नसेल तर इतरांनी मास्क घालूनही संसर्ग होण्याचा धोका हा ३० टक्के असतो. त्यामुळे बाधित आणि बाधा न झालेल्या रुग्णानेही मास्क घातला असेल तर संसर्ग होण्याचा धोका केवळ १.५ टक्के एवढाच राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 एम्सचे संचालक डॅा. रणदीप गुलेरिया म्हणाले, कोरोना काळात आपण होम आयसोलेशनचा पर्याय वापरायला हवा. घाबरून प्रत्येक जण रुग्णालयात दाखल व्हायला लागला तर तर जगात असे कुठलेच इन्फास्ट्रक्चर नाही जे सर्वांना दाखल करून घेऊ शकेल. त्यामुळे आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या कमी करायला हवी. रुग्णालयांचा वापर दक्ष राहून करायला हवा. अॅाक्सीजनचा आवश्यकतेनुसार वापर करणे खूप महत्वाचे आहे. सध्या लोक विनाकारण घाबरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com