Urmila responds to Kangana's criticism | Sarkarnama

कंगनाच्या टीकेला उर्मिलाचं प्रत्युत्तर ; संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

उर्मिला मातोंडकर यांनी त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही ट्विट केला आहे आणि अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात सध्या शीतयुद्ध चांगलेच रंगले आहे. कारण उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाविरोधात काही गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. ज्या गोष्टींना कंगनाने तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. 

बुधवारीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने उर्मिला यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न स्टार असा केला होता. ज्यानंतर छत्रपती शिवरायांचा फोटो ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.  प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय होता होता है असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही ट्विट केला आहे आणि अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

“प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय होता है” शिवाजी महाराज अमर रहें असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

नेमकं काय म्हणाली कंगना? 

उर्मिला मातोंडकर यांची एक आक्षेपार्ह मुलाखत पाहिली. ज्याप्रकारे त्या माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्ण डिवचण्यासारखं आहे. उर्मिला यांनी माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपाकडून तिकिट हवं आहे असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे त्या माझ्यावर शाब्दिक हल्ला करत आहेत. मात्र उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. हे जरा उर्मटपणाचं वाटेल पण त्या नक्कीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जात नव्हत्या. त्या कशासाठी ओळखल्या जात होत्या तर सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? असं म्हणत कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली.

या आरोपानंतर उर्मिला मातोंडकर यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया देत एक ट्विट केलं आहे आणि छत्रपती शिवरायांचा फोटोही त्यासोबत जोडला आहे. त्यामुळे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

 मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने आणि बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन असल्याचा आरोप केल्याने अभिनेत्री उर्मिला यांनी कंगनावर टीका केली होती. मात्र त्यानंतर कंगनाने त्यांना थेट सॉफ्ट पॉर्न स्टारच म्हटलं. ज्यानंतर अत्यंत संयमी प्रतिक्रिया देत संयमही प्रतिशोधको काबू करने का उपाय होता है.. असं उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते ? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना ? असा प्रश्न अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची जीभ घसरली आहे. काही दिवसापूर्वी ऊर्मिलाने कंगनावर टिका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने उर्मिलाबाबत अशी हीन भाषा वापरली आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर झालेली कारवाई ही चुकीची आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण कंगनाला पुरविण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा ही जनतेच्या पैशातून आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी कंगना त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टिका उर्मिलाने कंगनावर केली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख