केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना कोरोनाची लागण  - Union Minister Pralhad Joshi infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अंगडी कुटुंबाची भेट घेऊन सात्वंन करण्यासाठी मंत्री जोशी हे नुकतेच बेळगाव दौऱ्यावर होते.

बेळगाव : केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना आज (ता. 8 ऑक्‍टोबर) कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. 

डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार ते क्वारंटाइन झाले आहेत. याशिवाय, अलीकडील काळात जे कोणी त्यांच्या संपर्कात आले. त्यांनीही आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. 

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अंगडी कुटुंबाची भेट घेऊन सात्वंन करण्यासाठी मंत्री जोशी हे नुकतेच बेळगाव दौऱ्यावर होते.

या दरम्यान त्यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेतली. यादिवशी दिवसभर ते बेळगावात होते. येथून परतल्यानंतर त्यांना कोरोना संसर्गची लक्षणे दिसून आली. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख