मुंबईतील विजेची केंद्रीय उर्जा मंत्र्यांनीही घेतली दखल, म्हणाले, पुन्हा असे होणार नाही !  - The Union Energy Minister also took notice of the power in Mumbai and said, it will not happen again! | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईतील विजेची केंद्रीय उर्जा मंत्र्यांनीही घेतली दखल, म्हणाले, पुन्हा असे होणार नाही ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आम्ही केंद्रातील एक पथक तातडीने मुंबईत पाठवत आहोत. नेमकी काय समस्या निर्माण झाली ते जाणून घेतील

नवी दिल्ली : मुंबई क्षेत्रातील वीज खंडित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्री आणि महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. देशाच्या आर्थिक राजधानीतील वीज गेल्याची दखल केंद्रीय उर्जा मंत्री आर.के.सिंह यांनीही घेतली आहे. 

मुंबईतील वीजेविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की मुंबईतील दोन मेगावॉट वीज अचानक गायब झाली होती. आता दोन हजारपैकी 1900 मेगावॉट वीज रिस्टाअर करण्यात आली आहे. उर्वरित वीजही पूर्ववत सुरू होईल. राष्ट्रीय ग्रीड चांगले असून राज्याला पुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये समस्या निर्माण झाल्याने मुंबईची वीज गायब झाली होती. 

आम्ही केंद्रातील एक पथक तातडीने मुंबईत पाठवत आहोत. नेमकी काय समस्या निर्माण झाली ते जाणून घेतील. आता पुन्हा अशी वीज जाणार नाही याची सर्व ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले
दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या
 आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख