आणखी एका राज्यात आता राष्ट्रपती राजवट...

काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनीही सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली आहे.
Union Cabinet approves Presidents Rule in Puducherry state
Union Cabinet approves Presidents Rule in Puducherry state

पुदुच्चेरी : काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनीही सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाने केली आहे. काँग्रेसच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिध्द न करता आल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा दिला आहे. 

काँग्रेस आघाडीतील पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत सरकारला २२ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. पण बहुमत गाठण्यासाठी १४ आमदारांचा आकडा काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी सभागृहात भाषण करून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. 

तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी होती. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता होती. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. राजीनामा दिलेले पाच आमदार अद्याप कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत.

भाजपचे तीन आमदार असले तरी ते निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तसेच निवडणुका एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्ष एवढ्या कमी कालावधीसाठी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, हे स्पष्टच होते. भाजपकडून तसे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रीमंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सत्ता गमावल्यानंतर भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपने आमदारांना लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही भाजपवर टीका केली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आता पुदुच्चेरीमध्येही हेच पाहायला मिळाले. त्यांनी राजस्थामध्येही हे करण्याचा प्रयत्न केला पण येथील लोकांनी त्यांना धडा शिकवला, अशी टीका गेहलोत यांनी केली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com