माझ हे वाक्य अधोरेखित करुन ठेवा : राहुल गांधी  - Underline my sentence: Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

माझ हे वाक्य अधोरेखित करुन ठेवा : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जानेवारी 2021

देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

तामिळनाडू : नव्या कृषी कायद्यांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, आम्ही कृषी कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, हे काळे कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं ठाम मत राहुल गांधी यांनी तामिळनायडूमध्ये पत्रकार परिषदेत वक्त केल.

राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

शेतकरी कमकुवत झाला तर.... 

शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणी आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांना नाखूष ठेवून काही निर्णय घेणार असाल तर त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. तुम्ही इतिहास पडताळूण पाहा. जेव्हा केव्हा भारतीय शेतकरी कमकुवत झाला आहे. तेव्हा संपूर्ण देश कमकुवत झाल्याचं आपण पाहिलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

 

राहुल गांधी यांनी भारतीय हद्दीत चीनच्या घुसखोरीवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना प्रश्न विचारला आहे. भारताच्या भूभागात चीनचं सैन्य काय करत आहे? भारताच्या हद्दीत चीनचे लोक का ठाण मांडून बसलेत? यावर पंतप्रधान चकार शब्द देखील का काढत नाहीत? चीनचं सैन्य भारतीय हद्दीत असल्याचं स्पष्टपणे दिसत असतानाही पंतप्रधान मोदी शांत का? असे प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी विचारले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख