गुजरात कॅाग्रेसला फटका ; 'या' आमदारांनी दिला राजीनामा

गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी राजीनामा सादर केला आहे
42_119
42_119

अहमदाबाद : कॅाग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने गुरूवारी गुजरात कॅाग्रेसला मोठा फटका बसला आहे. या महिन्याअखेर राज्यसभेच्या काही जागांसाठी गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय नाट्य रंगले आहे. चार जागांसाठी 19 जून रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या चार जागांपैकी  भाजपने तीन जागांवर आणि कॉंग्रेसने एका जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.     


गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी राजीनामा सादर केला आहे. राजीनामा स्वीकारला असल्याचे राजेंद्र त्रिवेदी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. निवडणूकीच्या आधी भाजप विरोधी पक्षांची मोडतोड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पक्ष नेतृत्वाशी आपण नाराज असल्याने राजीनामा देत असल्याचे अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी सांगितले. अक्षय पटेल हे वडोदराच्या करंजन मतदार संघातून तर जीतू चौधरी हे वलसाडच्या कापडा मतदारसंघातून निवडून आले होते. आतापर्यंत सात कॉंग्रेस आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.


पक्ष नेतृत्वाबाबत नाराज 

गुजरात विधानसभेत सत्ताधारी भाजपकडे १०3 आमदार आहेत आणि विरोधी कॉंग्रेसकडे आता 66 आमदार आहेत. कॉंग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार उभे केले आहेत,
तर भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत. यामुळे कॉंग्रेसला दुसरी जागा जिंकणे कठीण झाले आहे. अभय भारद्वाज, रमिलाबेन बारा आणि नरहरी अमीन हे भाजपचे उमेदवार आहेत.

कॉंग्रेसने निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल आणि भारतीसिंह सोलंकी यांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे नरहरी अमीन यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाबाबत नाराज असल्याने या दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आणखी काही कॅाग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. पक्ष नेतृत्वाबाबत नाराज असल्याने ते पक्ष सोडत असल्याचे अमीन यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com