शेतकरी आंदोलनात फूट; हिंसाचारानंतर दोन संघटनांची माघार

भारतीय किसान यूनियन (भानु) वअॉल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती या संघटनांनी आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
Two farmers organizations withdraw from farmers protest after violence in delhi
Two farmers organizations withdraw from farmers protest after violence in delhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे परवापर्यंत शिस्तीत सुरू असलेले आंदोलन संपविण्यास दिल्लीत हिंसाचार कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्लीमध्ये काल झालेल्या हिंसक मोर्चामुळे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता शेतकरी संघटनांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. दिल्लीत झालेला हिंसाचार पुर्वनियोजित होता का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

मोर्चादरम्यान पोलिसांना झालेली मारहाण, लाल किल्ल्यावर फडकविण्यात आलेला शेतकरी संघटनेचा ध्वज, पोलिसांच्या गाड्यांची मोडतोड या घटनांमुळे काही शेतकरी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनापासून दूर होत असल्याचे जाहीर केले.

बुधवारी भारतीय किसान यूनियन (भानु)चे अध्यक्ष ठाकुर भानु प्रताप सिंह यांनी हिंसाचारामुळे आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ''प्रजासत्ताक दिनी दिल्लीत घडलेल्या घटनांमुळे खुप दु:ख झाले आहे. त्यामुळे आमची संघटना आंदोलन संपवत आहे.'' या संघटनेतील शेतकरी नोएडा-दिल्ली मार्गावरील चिल्ला सीमेवर आंदोलन करत होते. 

अॉल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे वी. एम. सिंह यांनीही आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. ''आंदोलनाची दिशा वेगळी असलेल्यांसोबत आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो,'' अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.  

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये योगेंद्र यादव, राकेश टिकैत यांचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी 22 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांना झालेल्या मारहाणीची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून नेत्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com