वादग्रस्त वास्तूबाबत टि्वट.. ओवैसी यांच्याविरोधात तक्रार

असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात दिल्ली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओवैसी यांनी अयोध्या येथील वादग्रस्त वास्तूबाबत टि्वट केले होते.
Asaduddin Owaisi.jpg
Asaduddin Owaisi.jpg

नवी दिल्ली :  'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात दिल्ली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओवैसी यांनी अयोध्या येथील वादग्रस्त वास्तूबाबत टि्वट केले होते. याबरोबरच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी टि्वट करून समाजात अशांती पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयाने राम मंदिर निर्माण करण्याची परवानगी दिली आहे, या निकालाच्या विरोधात त्यांचे टि्वट असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.


मंगळवारी असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत टि्वट केले होते. 'बाबरी मस्जिद थी, है और रहेगी,' असे टि्वट त्यांनी केले होते. यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही याबाबत टि्वट केले होते. याबाबत ओवैसी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच कोट्यवधी लोकांनी रामजन्मभूमीसाठी सहभाग घेतला. या सर्व सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी देशवासियांच्या वतीने अभिवादन करतो. रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडला गेलेला प्रत्येक जण भावनाप्रधान झाला आहे. प्रभू राम आपल्या मनात मिसळून गेले आहेत. कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि ती भविष्यातही मिळत राहील, असे नरेंद्र मोदी यांनी काल राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले. 

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उमा भारती यांच्यासह 175 मान्यवरांना निमंत्रण करण्यात आले होते. यामध्ये साधुसंताचाही समावेश होता. भूमिपूजनानंतर मोदी यांच्यासह प्रमुख वक्‍त्यांची भाषणेही झाली. देशभर आजच्या अयोध्येतील कार्यक्रमाचीच चर्चा होती. या कार्यक्रमानंतर ओवैसी यांनी आपल्या ट्‌विटर हॅंडलवर ट्‌विट करून मोदींना लक्ष्य केले होते.

ते म्हणाले, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून गुप्ततेची शपथ घेतली आहे, असे असताना ते अयोध्येत जातात. राम मंदिराचे भूमिपूजन करतात. हे योग्य नाही. आज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीचा पराभव झालेला आहे. तसेच हिंदुत्व यशस्वी झाले आहे." 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com