भाजपमध्ये प्रवेश केला अन् स्टेजवरच उठाबशा काढल्या...नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Trinamool Leader Performs Squats Holding Ears On Stage
Trinamool Leader Performs Squats Holding Ears On Stage

कोलकता : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसमधील आमदार व इतर नेत्यांना पक्षात घेण्यासाठी पायघड्या टाकल्या आहेत. अशाच एका नेत्यांने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पण प्रवेशावेळी त्यांनी चक्क उठाबशा काढल्या. तृणमूल काँग्रेसमध्ये इतके दिवस राहिल्याबद्दल त्यांनी स्वत:लाच शिक्षा करून घेतली. 

सुशांता पाल यांनी गुरूवारी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. ते तृणमूलमधून भाजपात आलेले सुवेंदु अधिकारी यांचे जवळचे मानले जातात. मेदिनापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते तृणमूलच्या खरगपूर शाखेचे उपाध्यक्ष होते. 

भाजपमध्ये प्रवेशावेळी त्यांनी जोरदार भाषणही केले. पण मध्येच बोलणे थांबवत त्यांनी स्टेजवरच उठाबशा काढण्यास सुरूवात केली. इतर नेत्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ''जुलमी तृणमूलमध्ये असताना केलेल्या पापांचे हे प्राचश्चित आहे. पक्षातील वरिष्ठांकडून मला लोकांच्या विरोधातील अनेक निर्णयांमध्ये सहभागी व्हावे लागले. त्याची मी माफी मागतो,'' असे म्हणत पाल यांनी उठाबशा काढण्यास सुरूवात केली.

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रीति गांधी यांनीही हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ''तृणमूलने 2018 मध्ये पंचायत निवडणुका मुख्य वातावरणात पार पडू दिल्या नाहीत. त्यांनी धमकावरून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या. मला त्याविरोधात बोलण्याची इच्छा होती. पण माझा आवाज दाबला जात होता. म्हणून मी भाजपध्ये आलो आहे,'' अशी टीकाही पाल यांनी केली. 

सुवेंदू अधिकारी यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये काही महापालिकांचे महापौर, नगरपालिकांचे अध्यक्षही आहेत. तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अमित मैती यांनी पाल यांच्या प्रवेशावर टीका केली. ते म्हणाले, ''पाल यांनी चार वर्षांपूर्वीच आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. आता ते भाजपमध्ये जाण्याची नौटंकी करत आहेत.''

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com