नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला झाला आहे. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. यात राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे दहा ते बारा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांच्या दैाऱ्याआधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बाँम्बहल्ल्यानंतर काही मिनिटात पोलिस घटना रवाना झाले आहेत. हल्ल्यात राज्यमंत्री झाकीर हुसेन गंभीर जखमी झाले आहेत.
याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती : पोलिस आयुक्त https://t.co/V0hNOQkG4v #punePolice #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 17, 2021
मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. अज्ञात व्यक्तींनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले.
हुसेन आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१६ विधानसभा निवडणुकीत जांगीपूरमधून निवडून आले. बंगालमध्ये मंत्र्यावर हल्ला होण्याचा गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना आहे. राज्यमंत्री हुसैन रेल्ले स्थानकावर कोलकाता येथे जाणाऱ्या रेल्वेची प्रतिक्षा करीत होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. पश्चिम बंगाल मध्ये एप्रिल-मे मध्ये निव़डणुका होत आहेत.
हेही वाचा : काँग्रेसने 'सनी पाजी'ला पाजले पाणी; मतदारसंघातच मोठा पराभव...
चंदीगढ : लोकसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या मतदारांनी खासदार सनी देओल यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुर्णपणे नाकारले आहे. त्यांच्या गुरदासपूर मतदारसंघात भाजपला २९ पैकी एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. सर्व जागांवर काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला होता. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उलट चित्र दिसून आले. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये दीप सिध्दूचे नाव पुढे आले आहे. त्याला अटकही करण्यात आली. त्याच्यासोबतचे सनी देओल यांची छायाचित्रे खूप व्हायरल झाली होती. त्यामुळे भाजपनेच ही हिंसा घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता.

