भारताचे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त देशाची आदरांजली 

पंतप्रधान मोदी हे तर कालपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
 भारताचे लोह पुरूष सरदार  वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त देशाची आदरांजली 

नवी दिल्ली : थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित आज देशभर आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

पटेल यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवणही करून देण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची अखंडता राखण्याचे श्रेय अर्थात सरकार पटेल यांना जाते. 

सरदार वल्लभभाई पटेल यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांबरोबर देशभर आदरांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान मोदी हे तर कालपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

आजचा दिवस दरवर्षी देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मोदी यांनी गुजरातमधील केवाडीया येथे एकता दिवसानिमित्त काढण्यात आलेल्या परेडवेळी उपस्थित होते. मोदी यांनी पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. 

तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, की सरदार पटेल यांनी भारताची अखंडचा ठेवण्यात मोठे योगदान दिले ते कदापी विसरता येणार नाही. पटेल हे भारताचे लोह पुरूष होते तसेच ते एक कुशल प्रशासक, उत्तम संघटक होते. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त माझे कोटी कोटी प्रणाम. 

हे ही वाचा : 

हिवाळ्याआधीच दिल्लीचे ‘गॅस चेंबर’ 
नवी दिल्ली: दिल्लीतील सुमारे २ कोटी जनता सध्या दुहेरी संकटात आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असतानाच प्रदूषणाच्या पातळीतही चिंताजनक वाढ झाली आहे. दिल्लीतील आनंद विहारसह आनंद विहार, लोधी रस्ता, नरेला, अलीपूर, बवाना व द्वारका सेक्‍टर या मुख्य प्रदूषण मापन केंद्रांवर गेले दोन दिवस नोंद होणारा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्‍यूआय)-४०० च्या पुढे म्हणजे जगण्यासाठी अति धोकादायक किंवा गंभीर वळणावर पोचला आहे. 

केंद्राच्या वायू गुणवत्ता संस्थेच्या पाहणीत दिल्लीतील प्रदूषणास शेजारील राज्यांतून येणाऱ्या शेतातील काडीकचऱ्याचा धूरच सर्वाधिक कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे, फक्त बुधवारच्या दिवशी उत्तर प्रदेश व हरियाणासह चारही राज्यांत ३००० ठिकाणी शेतातील तण जाळण्यात आले व तो धूर थेट दिल्लीत येऊन दिल्लीची हवा पुन्हा विषारी बनली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com