आजचा वाढदिवस  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान - Today birthday Prime Minister Narendra Modi  | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात.

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : 17 सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि 26 मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्‍टोबर 2001 पासून 22मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते 2001 गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. 

हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. 

मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1991 मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. 1991 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. 

गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. 2001 मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. उत्तम संघटक, एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. 

शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपस सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत 1995 मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती. 

राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ते पंतप्रधान बनले. दुसऱ्यावेळीही त्यांनी स्पष्ट बहुमत मिळविले. यूपीतील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून गेले आहे. 

पंतप्रधान मोदींवरील पुस्तके 
नरेंद्र मोदी ऊर्फ नमो यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी :- 

 1. अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी (भाऊ तोरसेकर) 
 2. In Era of Modi (English, आर.के. सिन्हा) 
 3. कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद) 
 4. कुशल सारथी नरेंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर) 
 5. दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी) 
 6. द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाईफ 
 7. नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके) 
 8. Narendra Modi A Biography (English, कौशल गोयल) 
 9. Narendra Modi : A political Biography (इंगर्जी, ×ंडी मारिनो) 
 10. Narendra Modi : Creative Disruptor (English, आर. बालाशंकर) 
 11. नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये) 
 12. नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर) 
 13. नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर) 
 14. नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी) 
 15. Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय) 
 16. दी पॅराडॉक्‍सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अॅन्ड हिज इंडिया (इंग्रजी, शशी थरूर) 
 17. The Modi Effect : Inside Narendra Modi's Campaign to Trasform India (English, Paperback, लेखक - लान्स प्राईस) 
 18. पुन्हा मोदीच का? (भाऊ तोरसेकर) 
 19. The Man of the Moment - Narendra Modi (English, एम.व्ही. कामत) 
 20. मोदिनॉमिक्‍स (इंग्रजीत आणि मराठीतही, डॉ. विनायक गोविलकर) 
 21. मोदी - अर्थकारण नीती आणि रणनीती (चंद्रशेखर टिळक) 
 22. मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन 
 23. Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन) 
 24. स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर) 
 25. स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख