येडियुरप्पांवर टांगती तलवार! भाजपमध्ये पडले तीन गट - Three groups in karnataka BJP CM B S Yediyurrappa in trouble | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

येडियुरप्पांवर टांगती तलवार! भाजपमध्ये पडले तीन गट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जून 2021

येडियुराप्पा समर्थक, विरोधक व तटस्थ असे तीन गट पडल्याचे स्पष्ट झालं.

बेंगलुरू : कर्नाटक भाजपमध्ये तीन गट पडल्याचे गुरूवारी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. येडियुरप्पा यांचे वय आणि कामाच्या पध्दतीवर ठपका ठेवत काही आमदारांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. याची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून राज्यातील आमदारांची बाजू ऐकून घेतली जात आहे. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होणार आहे. (Three groups in karnataka BJP, CM B S Yediyurrappa in trouble )

भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी गुरुवारी भाजपच्या आमदारांची मते जाणून घेण्यासाठी त्यांचे अहवाल घेतले. पक्षातील अनेक आमदारांनी अरुण सिंग यांची भेट घेऊन अहवाल दिला. येडियुराप्पा समर्थक, विरोधक व तटस्थ असे तीन गट पडल्याचे यावेळी स्पष्ट झालं. गुरूवारी सकाळपासूनच अरूण सिंग यांनी अनेक बैठका घेतला. आमदार व प्रमुख नेत्यांची त्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. 

हेही वाचा : नंदीग्रामच्या निकालाबाबत ममता बॅनर्जींच्या याचिकेवर आज सुनावणी

येडियुरप्पा समर्थकांनी बंडखोर आमदारांवर शिस्तभंग कऱण्याची कारवाई केली. तसेच येडियुरप्पा यांना कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी देण्याची मागणीही काही आमदारांनी केली. तर विरोधी गटातील आमदारांनी येडियुरप्पा यांच्या वयाचे कारण पुढे केले. वयामुळे ते निष्क्रिय झाले आहेत. त्यांचे पुत्र सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करतात. आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकास फंडातही भेदभाव केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशी समझोता करून मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेत आहेत, असे अरूण सिंग यांच्या निदर्शनास आणून दिले. काही आमदार मात्र तटस्थ राहिले. त्यांनी या प्रकरणावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्याविरुद्धही तक्रारी करण्यात आल्या आहेत. येडियुरप्पा आणि कटील यांच्यामध्येच वाद असल्याचे यातून समोर आलं आहे. आपण येडियुरप्पांचे समर्थक असल्याचे समजून कटील यांच्याकडून पक्ष संघटनेत स्थान दिले जात नसल्याचा दावा काही नेत्यांनी अरूण सिंग यांच्यासमोर केला. काही नेत्यांबाबत जाणीवपूर्वक पक्षपात केला जात असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. 

नेतृत्व बदलाबाबत माध्यमांशी न बोलण्याची ताकिद अरूण सिंग यांनी आमदारांना दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ व आमदार रेणुकाचार्य यांच्यासमोरच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी न बोलता अहवालात आपली भूमिका मांडण्याची सुचना त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख