भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या.. - Three BJP workers killed in terrorist attack at Kulgam in Jammu and Kashmir | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या..

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

हल्ल्यातील जखमींनी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॅाक्टरांनी घोषित केले. कुलगाम पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कुलगाम:  जम्मू - काश्मीर येथील कुलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी सव्वासाठ वाजता ही घटना घडली. कुलगाम पोलिसांना वाईके पुरा गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. 

या दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. हल्ल्यातील जखमींनी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॅाक्टरांनी घोषित केले. कुलगाम पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सव्वा आठ वाजता हा हल्ला झाल्याचे कुलगाम पोलिसांनी सांगितले. 

हत्या झालेल्या या भाजपच्या तीनही कार्यकर्त्यांची ओळख पटली आहे. भाजपचे जिल्हा युवा महासचिव फिदा हुसैन यातू, उमर राशिद आणि उमर रमजान हाजम यांनी या तिंघाना ओळखले आहे. हे तीनही भाजपचे कार्यक्रते वाईके पुरा या गावातील रहिवासी असल्याचे कुलगामच्या पोलिसांनी सांगितले. 

 
नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता उमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला आहे. उमर अब्दुल्ला यांनी याबाबत टि्वट करून निषेध व्यक्त केला आहे. दक्षिण काश्मिर येथील कुलगाम जिल्ह्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. त्यांचा आत्मास शांती लाभो, त्यांच्या कुंटुबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, असे टि्वट उमर अब्दुला यांनी केले आहे.  

हेही वाचा : राहुल गांधी, किमान "तुमच्या' पाकचे तरी ऐका : नड्डा
 
नवी दिल्ली : मागच्या वर्षी फेब्रुवारीत पाकने पकडलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्वरित सोडले नाही तर भारत त्या देशावर जबरदस्त हल्ला करण्याच्या तयारीत होता, या पाकिस्तानी संसदेत झालेल्या जाहीर खुलाशानंतर सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी व विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "कॉंग्रेसच्या शहजाद्याचा देशावर विश्‍वास नाही. त्यांनी आता त्यांचा विश्‍वासू देश पाकिस्तानचे म्हणणे तरी ऐकावे' असा टोला भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लगावला आहे. पाकिस्तानचे खासदार सरदार अयाज सादिक यांनी माजी विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या हवाल्याने म्हटले की अभिनंदन याला त्वरित सोडले नाही तर भारत पाकिस्तानवर त्याच दिवशी रात्री 9 ला हल्ल्याच्या तयारीत आहे. खुदासाठी याला (अभिनंदन) सोडून द्या असे कुरेशी यांनी लष्कराला विनविले. हे ऐकताच पाक लष्करप्रमुख बाजवा घामाने डबडबले व त्यांचे पायही लटपटत होते. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने कॉंग्रेसवर चौफेर हल्ला चढविला आहे 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख