...तर कोरोना लस मोफत मिळू शकेल...

केंद्र सरकार ही लस नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सांगितले.
Adar Punawala.jpg
Adar Punawala.jpg

पुणे : ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या माध्यमातून  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या कोरोना लशींचे  पन्नास टक्के वितरण हे भारतात होणार आहे. त्यानंतर बाकी लस ही जगभरात वितरीत केली जाणार आहे. केंद्र सरकार ही लस नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे  सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सांगितले. एका खासगी वाहिनाला दिलेल्या मुलाखतीत आदर पुनावाला बोलत होते.  ऑक्सफर्डच्या या प्रोजेक्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट सहभागी आहे.  सीरम कंपनी जगात सर्वाधिक वॅक्सिन तयार करण्यासाठीही ओळखली जाते.  

आदर पुनावाला म्हणाले,  "ही लस सरकार विकत घेणार आहे. लसीकरण मोहीमेअंतर्गत ही लस मोफत देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणताही खर्च येणार नाही.  या लसीची ब्रिटनमधील चाचणी सकारात्मक आली आहे.  कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. यासाठी सगळ्या जगाकडे एकसारखेच पाहवे लागणार आहे.  सध्या प्रायोगिक तत्वावर ही लस सीरममध्ये तयार करण्यात येत आहे."

"चाचणी यशस्वी झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणावर लशींचे उत्पादन करण्यात येणार आहे. यातील पन्नास टक्के डोस हे भारतातसाठी तर बाकी डोस जगभरात वितरीत करण्यात येणार आहे. पण  सर्वप्रथम ही लस कोणाला द्यायची याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.  ऑक्सफर्डचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर सीरम इन्स्टिट्यूट वॅक्सिनचे 100 कोटी डोस तयार करेल. यातील 50 टक्के भाग भारतासाठी असेल. आणि 50 टक्के गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना पाठवला जाईल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वॅक्सिन तयार कऱण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत होणार आहे," असे आदर पुनावाला यांनी नमूद केले आहे.
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा छगन : भुजबळ म्हणाले, लस मिळेपर्यंत कोरोना विरुद्ध लढाई सुरूच राहील

नाशिक : "जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही,"असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शहरातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'मिशन नाशिक झिरो' या उपक्रमाचे उदघाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नाशिकमध्ये कोरोनाला अटकाव ‘मिशन झिरो’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी काढले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com