नगरपालिकेवर दहशतवादी हल्ला; नगरसेवकासह सुरक्षारक्षकाचा मृत्यू

नगरपालिकेमध्ये ब्लॉक विकास परिषदेची बैठक सुरू असतानाच हा हल्ला झाल्याचे समजते.
Terrorists fired at Municipal Office Sopore one councillor died
Terrorists fired at Municipal Office Sopore one councillor died

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील सोपोरमध्ये आज दुपारी दहशतवादी हल्ला झाला. सोपोरमधील नगर पालिकेच्या कार्यालयावर बेधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये ब्लॉक विकास परिषदेचे नगरसेवक व त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अध्यक्षाही जखमी झाल्याची माहिती आहे.

नगरपालिकेमध्ये ब्लॉक विकास परिषदेची बैठक सुरू असतानाच हा हल्ला झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच सोपोरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये उत्तर काश्मीरमधील एका पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच आज हल्ला झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या बाहेर बीडीसीचे सदस्य रियाज अहमद आणि त्यांच्या सुरक्षारक्षक शफात अहमद यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये बीडीसीच्या अध्यक्षा फरीदा खान याही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टेंस फोर्स या दहशतवादी संघटनेने घेतल्याचे समजते. या संघटनेचे नाव वर्षभरापूर्वीच समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी सहभागी होते, याची माहिती मिळू शकली नाही. हे दहशतवादी परिसरातच लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव घातला असून परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे. 

या हल्ल्यानंतर काश्मीरमधील नेते शफीक मीर म्हमाले, या हल्ल्यात एका नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पंचायतच्या नेत्यांना सुरक्षा द्यायला हवी. आम्ही त्रिस्तरीय पंचायत प्रणाली बनवण्याचे काम केले आहे. पण केंद्र सरकार आम्हाला सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, अशी टीका मीर यांनी केली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com