धक्कादायक : आरोग्यमंत्र्यांचीच मंत्रीमंडळातून हकालपट्टी... 

अवैधरीत्या घेतलेल्या जमिनीबाबत चैाकशीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
Sarkarnama Banner - 2021-05-03T153820.359.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-03T153820.359.jpg

हैदराबाद : तेलंगणाचे आरोग्य मंत्री एटेला राजेंद्र यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली.  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल तमिळसई सौंदर्यराजन यांनी काल (ता. २) याबाबतचा आदेश दिला. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली जमीन अवैधरीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने राजेंद्र यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

राजेंद्र यांच्याकडून आरोग्य विभागाची सूत्रे शनिवारी (ता. १) काढून घेतली होती. मात्र तरीही त्यांनी राजीनामा न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. हैदराबादपासून ५५ किलोमीटर दूर असलेल्या अचमपेट येथे राजेंद्र यांनी केलेल्या अवैधरीत्या घेतलेल्या जमिनीबाबत चैाकशीचा आदेश राव यांनी शुक्रवारी दिला होता.  

याबाबत राजेंद्र यांनी सांगितले की, मला माहिती मिळाली आहे की माझ्याकडील आरोग्यविभाग मुख्यमंत्र्यांनी काढून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अधिकार आहे. सर्व विभागावर त्यांचे नियंत्रण आहे. नियोजनपूर्व केलेला हा प्रकार आहे. सध्या मी कोरोना उपाययोजनांच्या कामात व्यग्र आहे. माहिती घेतल्यानंतर याबाबत सविस्तर बोलेन.

मेडकचे जिल्हाधिकारी हरिश यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत मुख्यमंत्री राव यांना रविवारी सायंकाळी अहवाल दिला. मेडक जिल्ह्यातील अचमपेठ आणि हकीमपेठ येथील आठ शेतकऱ्यांना सरकारने १९९४ मध्ये जमीन दिली होती. ती राजेंद्र यांनी ताब्यात घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ही तक्रार खरी असल्याचे चौकशीत आढळून आल्याने त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी राव यांनी राज्यपाल सौंदर्यराजन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. 

हेही वाचा : ठाकरे सरकारची घरात बसून घोषणाबाजी..फडणवीस करताहेत रस्त्यावर उतरुन काम...
 
मुंबई  :  राज्य सरकार केवळ घरात बसून घोषणा देत असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून काम करीत आहेत व आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. जोगेश्वरी तसेच नवी मुंबईतील उलवे येथे भारतीय जनता पक्षातर्फे उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोनाच्या वाढत्या फैलावातही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यात कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता असल्याने या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत. परंतु राज्य सरकार केवळ घोषणा देण्याचे काम करीत आहे, अशी खरमरीत टीका दरेकर यांनी यावेळी केली.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com