तहसिलदाराने घरातच जाळले वीस लाख रुपये; जळालेल्या नोटांसमोरच अटक

तहसिलदाराने एका ठेक्यासाठीएक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे आली होती.
Tehsildar burns 20 lakh as ACB visits home over bribery allegations
Tehsildar burns 20 lakh as ACB visits home over bribery allegations

जयपुर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडण्याच्या भितीने एका तहसिलदाराने स्वत:ला घरात कोंडून घेत 20 लाख रुपये शेगडीवर जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अर्धवट जळालेल्या नोटासमोरच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तहसिलदाराला अटक केली आहे. हे तहसीलदार भ्रष्टाचारी असल्याची माहिती एससीबीला मिळाली होती.

राजस्थानमध्ये हे प्रकार घडला आहे. मागील काही दिवसांपासून राजस्थानमधील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार समोर आले आहेत. हा प्रकार सिरोही जिल्ह्यातील पिंडो बारातचे तहसिलदार कल्पेश कुमार जैन यांच्याबाबत घडला आहे. एसीबीकडे जैन यांच्याविषयी एक तक्रार आली होती. एका ठेक्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच ते एका अधिकाऱ्यामार्फत घेणार होते. 

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला  रंगेहाथ पकडले. परबरत सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. कल्पेश कुमार जैन यांच्या सांगण्यावरून पैसे स्वीकारल्याचे सिंह यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सिंह यांना अधिकारी जैन यांच्या घरी घेऊन गेले.

एसीबीचे अधिकारी घरी येत असल्याचे समजल्यानंतर जैन यांनी दरवाजा बंद करून स्वत:ला कोंडून घेतले. तसेच घरातील सुमारे 20 लाख रुपये शेगडीवर ठेवून पेटविले. घरातून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर एसीबीचे अधिकारी दरवाजा तोडून घरात घुसले. शेकडीवर नोटा पेटत असल्याचे पाहून अधिकाहीही अवाक झाले. तोपर्यंत वीस लाख रुपयांपैकी अर्धे पैसे जळाले होते. 

जैन यांना अधिकाऱ्यांनी तातडीने अटक केली. त्यानंतर घराची तपासणी केल्यानंतर एक लाख रुपये साठ हजार रुपये जप्त करण्यात आले. जैन यांच्या इतर संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com