टीम इंडियालाही शेतकरी आंदोलनाची चिंता ; विराट कोहली म्हणतो... - Team India also concerned about the farmers movement says virat kohali | Politics Marathi News - Sarkarnama

टीम इंडियालाही शेतकरी आंदोलनाची चिंता ; विराट कोहली म्हणतो...

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे लोण आता जगभरात पोहचले आहे. पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेकांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे लोण आता जगभरात पोहचले आहे. पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेकांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यावरून सचिन तेंडूलकर, विराट कोहलीसह काही खेळाडू व सेलिब्रिटींनी त्याला विरोध करणारे ट्विट केले. आता टीम इंडियाच्या गुरूवारी झालेल्या बैठकीतही शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचे विराटने सांगितले. 

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगप्रसिध्द पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. रिहानाच्या विरोधात अनेक सेलिब्रेटी आता मैदानात उतरू लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतनंतर सचिन तेंडुलकरसह टीम इंडियातील विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे सरकारच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. 

इंग्लंडविरूध्दची पहिली कसोटी चेन्नईत होणार आहे. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विराटने शेतकरी आंदोलनावर टीम इंडियाच्या बैठकीत झाल्याचे त्याने सांगितले. प्रत्येकाने त्यावर आपली मते मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ''देशात कोणत्याही मुद्दयावर देशात चर्चा होत असेल तर आम्ही त्यावर बोलतो. त्याबाबत प्रत्येक जण त्यांना जे वाटते ते बोलतो. शेतकरी आंदोलनावर बैठकीत आम्ही बोललो. त्यानंतर आम्ही टीमच्या नियोजनावर चर्चा सुरू केली,'' असे विराट म्हणाला.

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकरने ट्विट केलं आहे. त्याने म्हटलं आहे की, 'भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होणार नाही. बाह्य शक्तींनी केवळ प्रेक्षक बनावे यातील भागीदार बनू नये. भारतीयांना भारत माहिती आहे आणि ते भारताबाबतचा निर्णय घेऊ शकतात. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात.' 

'शेतकरी हा देशाचा अविभाज्य भाग आहेत. देशात शांतता आणि पुढे जाण्यासाठी आंदोलनातून लवकरच तोडगा निघेल,' असे विराटने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख