उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.. ''तुमच्या बेजबाबदारपणामुळे १३५ शिक्षकांचा मृत्यू...'' - teachers died in holding panchayat election llahabad hc  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.. ''तुमच्या बेजबाबदारपणामुळे १३५ शिक्षकांचा मृत्यू...''

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, न्यायालयाने सरकारला खडसावले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पंचायत समितीच्या  निवडणुकीत १३५ शिक्षकांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने Allahabad High Court उत्तरप्रदेश सरकारला Uttar Pradesh Govt जाब विचारला आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  

पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणूक आयोग, पोलिस दोघांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. 'निवडणूक आयोगाचे न्यायालयात हजर राहून याचा जाब द्यावा,'  असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे.  पुढील निवडणुकीत असा प्रकार झाला तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात नुकत्याच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यात निवडणुक प्रक्रियेत सहभागी असलेल्या १३५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार हतबल झाले आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीत सरकार सक्रिय झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या शिक्षकांचा मृत्यू झाला. तुमच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचा असा मृत्यू झाला तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. 

''राज्यात मी म्हणेन तसेच चालेल. अन्यथा कोणाचेही काहीही चालणार नाही, या भूमिकेतून सरकारने आता बाहेर पडावे, दुसऱ्याच्या विचाराला महत्व द्या, '' असे न्यायालयाने म्हटलं आहे.  ऑक्सीजन, बेडची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवठा, त्याचा काळाबाजार याबाबत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख