कोलकता : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृणमूलचे डझनभर आमदार फोडून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे ममतादीदी भाजपच्या आक्रमकतेला घाबरल्या असल्याची चर्चा सुरू आहे. मता बॅनर्जी सरकारमधील मंत्री असलेले तपस रॉय यांच्या एका वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे.
एका सभेदरम्यान तसप रॉय यांनी थेट काँग्रेस व डाव्या पक्षांना तृणमूलसोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यावरून बंगालमधील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपनेही रॉय यांच्या वक्तव्यावरून तृणमूलला घेरण्यास सुरूवात केली आहे.
महात्मा गांधींची नात भेटली शेतकऱ्यांना, म्हणाल्या... #Sarkarnama #MahatmaGandhi #TaraGandhiBhattacharjee #FarmersProstests #FarmersStandingFirm #Politicalnewshttps://t.co/e0QB8wSvQM
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 14, 2021
रॉय म्हणाले होते की, ''पश्चिम बंगामध्ये आपलीच सत्ता येईल, असे भाजप म्हणत आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष एकटे त्यांना अडवू शकत नाहीत. तुमची कमी होत असलेल्या ताकदीच्या जोरवार हे करू शकणार नाही, हे तुम्हालाही चांगलेच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सोबत यायला हवे.'' आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांनी सोबत येण्याचे निमंत्रणच रॉय यांनी दिल्याची चर्चा बंगालमध्ये सुरू आहे.
यावर बोलताना भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, ''भाजपला हरविण्यासाठी रॉय यांच्याकडून सातत्याने काँग्रेस व डाव्या पक्षांना तृणमूलसोबत येण्याबाबत विचारले जात आहे. हे केवळ तपस यांचे वक्तव्य नसून तृणमूललाच हे वाटत आहे. ममता बॅनर्जी यांनी सांगितल्याशिवाय हे कोणीत उघडपणे बोलणार नाही. भाजपला ते एकटे हवू शकणार नाहीत, याची जाणीव तृणमूलला झाली आहे.''
''आता परिवर्तन होणारच आहे. रॉय जे म्हणाले आहेत, ते खरे आहे. सर्व जण एकत्र आले तरी आम्ही परिवर्तन करण्यासाठी सज्ज आहोत. बंगालच्या लोकांना आता ममता नको आहेत. त्यांना भाजप हवे आहे,'' असे घोष यांनी सांगितले.
दरम्यान, 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व डाव्या पक्षांना 76 जागा मिळाल्या होत्या. तर तृणमूलचे 211 उमेदवार निवडूण आले होते. काँग्रेस व डाव्या पक्ष या निवडणुकीतही एकत्र आले असून लवकरच जागा वाटप पूर्ण होणार आहे. पुढील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एकुण 294 जागांपैकी 193 जागांवर आतापर्यंत सहमती झाली आहे.
Edited By Rajanand More

