नववी ते अकरावीची परीक्षा नाही; या राज्याने घेतला महत्वपूर्ण निर्णय

विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे आज मुख्यमंत्र्यांनीविधानसभेत सांगितले.
Tamil Nadu to promote Class 9 to 11 students without any exams
Tamil Nadu to promote Class 9 to 11 students without any exams

चेन्नई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने इयत्ता नववी, दहावी व अकरावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे आज त्यांनी विधानसभेत सांगितले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडापल्ली के पलानीस्वामी यांनी सरकारच्या या निर्णयाची घोषणा केली. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्यातील स्थिती परीक्षा घेण्याइतपत चांगली नसल्याचे सांगतल्याने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी झालेल्या त्यांच्या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेत मिळालेल्या गुणांना 80 टक्के आणि त्यांच्या वर्गातील उपस्थितीला 20 टक्के गुण गृहित धरून त्याआधारे अंतिम गुण दिले जातील. तमिळनाडूतील शिक्षण विभागाने याबाबत अद्याप अधिकृत परिपत्रक काढलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. 

बारावीची परीक्षा होणार

इयत्ता बारावीची परीक्षा नेहमीप्रमाणे घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही शिक्षण विभागाने प्रसिध्द केले आहे. ही परीक्षा 3 ते 21 मे या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे ही परीक्षा मार्चऐवजी मे महिन्यात घेतली जाणार आहे. तमिळनाडूमधील शाळा मार्च 2020 पासून बंद होत्या. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावीचे वर्ग 19 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहेत.

निवृत्तीचे वय वाढविले

तमिळनाडू सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 59 वरून 60 करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही विधानसभेत ही घोषणा केली. तमिळनाडूनतील विधानसभेच्या निवडणूका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्याची टीका होऊ लागली आहे. 

हेही वाचा : पोलिस महासंचालकांनी कारमध्ये बसवून केला लैंगिक अत्याचार - आयपीएस महिलेची तक्रार

तमिळनाडूचे विशेष पोलिस महासंचालकांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर महासंचालकांची बदली करण्यात आली असून चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

तामिळनाडूचे विशेष पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेश दास यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करण्यात आलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी होती. ही महिला अधिकारी संबंधित जिल्ह्याची पोलिस अधिक्षक आहे. या दौऱ्यादरम्यान त्या दास यांच्या कारमधून प्रवास करत होत्या. या कारमध्येच दास यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com