भाजपची फजिती; प्रचारासाठी वापरला काँग्रेस खासदाराच्या पत्नीचा फोटो

राज्याची संस्कृती दाखविण्यासाठी एक महिला भरतनाट्यम करताना दाखविण्यात आली होती.
tamil nadu bjp used karti chidambaram wifes picture for election campaign
tamil nadu bjp used karti chidambaram wifes picture for election campaign

चेन्नई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जोरदारपणे केला जात आहे. भाजपकडूनही मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध व्हिडिओ तयार केले जात आहे. पण एका व्हिडिओवरून भाजपची चांगलीच फजिती झाल्याचे समोर आले आहे.

तमिळनाडूतील भाजप प्रदेश कार्यालयाने काल सोशल मीडियावर एक व्हिजिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ प्रचाराचाच एक भाग होता. पक्षाचा जाहीरनामा आणि व्हिजन दाखविण्यासाठी त्यामध्ये विविध कलाकार, मतदार आदींचा समावेश करण्यात आला होता. तमिळनाडूची संस्कृती दाखविण्यासाठी एक महिला भरतनाट्यम करताना दाखविण्यात आली होती. सुरूवातीला ट्विटरवर या व्हिडिओ भाजप कार्यकर्त्यांकडून लाईक्स मिळण्यास सुरूवात झाली. पण काही वेळातच भाजपने मोठा घोळ घातल्याचे समोर आले.

व्हिडिओतील भरतनाट्यम करताना दाखविण्यात आलेली महिला दुसरी-तिसरी कोणी नसून काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम या होत्या. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेले गाणेही विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांनी लिहिले होते.

हे लक्षात आणून दिल्यानंतर भाजपने तातडीने सोशल मीडियावरून हा व्हिडिओ हटवला. पण तोपर्यंत लाखो नेटकऱ्यांपर्यंत ही चूक पोहचली होती. त्यामुळे अनेकांची त्याचे स्क्रीनशॅाटही काढून ठेवले होते. त्यामुळे व्हिडिओ काढून टाकल्यानंतर भाजपची ही फजिती सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.

श्रीनिधी चिदंबरम या नृत्यांगणा आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. भाजपच्या या चुकीवर त्यांनीही टीका केली आहे. भाजपने आपल्या प्रचारासाठी व्हिडिओ वापरल्याने त्या संतापल्या आहेत. तसेच काँग्रेसनेही भाजपवर जोरदार टीका केली आहे.

''प्रिय भाजप, परवानगी घेणे हे तुमच्यासाठी कठीण आहे, हे समजू शकतो. पण तुम्ही श्रीनिधी चिदंबरण यांचा फोटो त्यांच्या संमतीशिवाय वापरू शकत नाही. यावरून तुमचा प्रचार खोटारटा असल्याचे सिध्द होते,'' अशी टीका तमिळनाडू काँग्रेसने केली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com