दक्षिण कोयंबतूरमधून अभिनेता कमल हासन यांची आघाडी... - Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates kamal hasan | Politics Marathi News - Sarkarnama

दक्षिण कोयंबतूरमधून अभिनेता कमल हासन यांची आघाडी...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

मक्कल निधी मय्यम हा पक्ष विधानसभेच्या 43 जागा लढवत आहे.

चेन्नई : तामिळनाडूत कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष विधानसभेच्या 43 जागा लढवत आहे.  दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कमल हासन यांनी दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून आघाडी घेतली आहे.  

या मतदारसंघातून कमल हासन यांच्या विरोधात भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन आणि काँग्रेसचे मयुर जयकुमार रिंगणात आहे. त्यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे.  तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहे.

तामिळनाडूमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने (एआयएडीएमके) बहुमत मिळवले होते. एआयएडीएमकेने  234 विधानसभा जागांपैकी 136 जागा जिंकल्या होत्या. द्रमुक (द्रमुक) यांना 89 जागा मिळाल्या. 2016च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 8 जागा मिळाल्या, तर इंडियन युनियन मुस्लिम लीगला १ जागा मिळाली होती. तामिळनाडूच्या कोलाथुर विधानसभा मतदार संघात डीएमकेचे अध्यक्ष एम.के. स्टालिन यांनी आघाडी घेतली आहे. 

तमिळनाडूच्या ही निवडणुक महत्वाची ठरणार आहे कारण दिग्गज नेते जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्याशिवाय पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.

अभिनेता कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष ४३ जागा लढवत आहे.  रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आणि राजकारणातून अंग बाजूला काढून घेतले. त्यामुळे कमल हासन यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख