असं आहे तालिबानचं नवं मंत्रिमंडळ ; महिलांकडे एकही खातं नाही. 

तालिबानने मुल्ला मोहम्मद अखुंदजादा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं आहे. महिलांकडे एकही खातं या सरकारमध्ये देण्यात आलेलं नाही.
Sarkarnama (71).jpg
Sarkarnama (71).jpg

काबूल : काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं  Taliban सरकार स्थापन होणार अशा चर्चा सुरू होत्या. काल अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केलं आहे. आज  नव्या सरकारचा new cabinet सूत्रे घेण्याचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तालिबानने मुल्ला मोहम्मद अखुंदजादा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं आहे. महिलांकडे एकही खातं या सरकारमध्ये देण्यात आलेलं नाही.

वीस वर्षांनी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं आहे. याआधी 1996 ते 2001 या कालावधीत अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती. मुल्ला मोहम्मद अखुंदजादा Mullah Mohammad Akhund हे पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत, तर अब्दुल गनी बरदार यांना उपपंतप्रधान जाहीर करण्यात आले आहे.   

माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी खैरउल्लाह खैरख्वा यांच्याकडेदेण्यात आली आहे. माव्लावी हक्कानी यांच्याकडे अंतर्गत व्यवहार मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. अब्दुल हकीम यांना न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शेर अब्बास यांच्या उप-परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे. महिलांकडे एकही खातं देण्यात आलेलं नाही. 

अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेने प्रतिहल्ला करून तालिबान्यांना सत्तेवरून काढलं होतं. अमेरिकेच्या सैन्याने 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकला होता. मात्र 2018 पासून अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्यास सुरूवात केली होती. 31 ऑगस्ट 2021 ला अमेरिकेतला शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून रवाना झाला. तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी काही महिने लागतील असं वाटलं होतं मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले.

कसं आहे तालिबानचं नवं मंत्रिमंडळ

मुल्ला मोहम्मद अखुंद-पंतप्रधान

मुल्ला गनी बरादर-उपपंतप्रधान

मुल्ला अबदस सलाम-उपपंतप्रधान

सिराजुद्दीन हक्कानी-गृहमंत्री

मौलवी मोहंमद याकूब - संरक्षणमंत्री

खैरूल्लाह खैरख्वा-माहिती प्रसारण मंत्री

जबिउल्लाह मुजाहिद- माहिती प्रसारण उपमंत्री

शेर अब्बास-उप विदेश मंत्री

शेख नुरूल्लाह-शिक्षण मंत्री

नूर मोहम्मद साकिब-हज आणि धार्मिक मंत्री

नुरूल्लाह नुरी-जनजातीय मंत्री

मोहम्मद युनुस अखुंदजादा-ग्रामीण आणि पुनर्विकास मंत्री

अब्दुल हकीम-न्याय मंत्री

हेदयातुल्लाह बद्री-अर्थमंत्री

मोहम्मद एसा अखुंद-पेट्रोलियम मंत्री

मुल्ला ताज मीर जवाद - गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख

मुल्ला अब्दुल हक वासिक - राष्ट्रीय संरक्षण संचालनालयाचे प्रमुख

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com