...तर बंगालचा लवकरच 'मिनी पाकिस्तान' ! - Suvendu accuses Mamata of minority appeasement, alleges Begum would turn Bengal into mini Pakistan | Politics Marathi News - Sarkarnama

...तर बंगालचा लवकरच 'मिनी पाकिस्तान' !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालच्या अल्पसंख्यांक समूदायाचे समाधान शोधण्यात व्यस्त असून ईद मुबारक म्हणण्याची त्यांना इतकी सवय झाली आहे की त्यांनी होळीच्या दिवशी हिंदू लोकांना होळीच्या शुभेच्छांऐवजी होळी मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस बंगालचा मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नंदिग्रामचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी दिली. 

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 27 मार्चपासून सुरूवात झाली. 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसते. राजकारण्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या फैरी सुरू झाल्याचेही दिसून येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालच्या अल्पसंख्यांक समूदायाचे समाधान शोधण्यात व्यस्त असून ईद मुबारक म्हणण्याची त्यांना इतकी सवय झाली आहे की त्यांनी होळीच्या दिवशी हिंदू लोकांना होळीच्या शुभेच्छांऐवजी होळी मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस बंगालचा मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नंदिग्रामचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी दिली. 

सुवेंदू अधिकारी म्हणाले, मतदारांनी सतर्क होण्याची गरज असून ममता यांना मत दिल्यास बंगाल मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, नंदिग्राम येथील विधानसभा निवडणुका 1 एप्रिल रोजी होणार असून ममता बॅनर्जी व सुवेंदू अधिकारी एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशच्या विकासाबाबत बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा विकास केला असून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर बंगालचा देखील उत्तर प्रदेशसारखाच विकास करू, असे आश्वासनही अधिकारी यांनी दिले. 

ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उडवत सुवेंदू अधिकारी म्हणाले, ममता बॅनर्जी या पूर्वी कारमधून प्रवास करायच्या. परंतु, आता मात्र त्या हेलिकाॅप्टरमधून प्रवास करत आहेत. पूर्वी ममता 400 रुपयांची साडी नेसायच्या, आता मात्र त्या 6 हजार रुपयांची साडी नेसतात. पूर्वी अजंटा कंपनीचे बूट वापरणाऱ्या ममता आता ब्रँडेड बूट वापरतात. सुवेंदू अधिकारीमध्ये मात्र बदल झालेला नसून मी जसा 2004 मध्ये होतो, तसाच 2021 मध्येही साधाच असून राहणीमानही साधीच आहे. बेगमला मत द्यायचे की  पुत्र, बंधू किंवा मित्र यांना मत द्यायचे, हे जनतेच्या हातात असल्याचेही अधिकारी म्हणाले. दरम्यान, बंगालमध्ये 294 जागांसाठी मतदान होत असून आठ टप्प्यात ते होईल.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख