कमलनाथ जिंकले...सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका!

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडुणकांच्या प्रचारात राजकीय नेत्यांकडून व्यक्तिगत चिखलफेकीला जोर आला होता. यामुळे निवडणूक आयोगाने कारवाईचा धडाका सुरू केला होता.
Supreme Court stays Election Commissions revocation of Kamal Naths star campaigner status
Supreme Court stays Election Commissions revocation of Kamal Naths star campaigner status

नवी दिल्ली : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला होता. कमलनाथ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देत आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. 

मध्य प्रदेशात काँग्रेसची सगळी भिस्त कमलनाथ यांच्यावर आहे. त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढल्याचे काँग्रेसच्या जिव्हारी लागले होते. अखेर कमलनाथ यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होते. त्यांचे स्टार प्रचारकपद काढून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत सरन्यायाधीशांनी आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली. स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुणी दिला? हा अधिकार आयोगाचा आहे की पक्षाच्या नेत्याचा? राजकीय पक्षाचा नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? स्टार प्रचारक आयोगच ठरवणार की राजकीय पक्ष, असे प्रश्न उपस्थित करीत सरन्यायाधीशांनी आयोगाला धारेवर धरले.  

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी आयटम असे संबोधन वापरले होते. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला होता आणि कमलनाथ यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली होती. 

कमलनाथ यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी इमरती देवींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी दोषी ठरवले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तंबीही दिली होती. आचारसंहितेच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, अशी ताकीद आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. 

निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले होते. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला होता. त्यांनी आचारसंहिता भंग केला असून, त्यांना दिलेल्या इशाऱ्याचे उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. 

आता कमलनाथ हे स्टार प्रचारक नसल्याने त्यांना स्वत:च्या पैशाने प्रवास आणि निवासासह इतर व्यवस्था करावी लागेल. याचबरोबर निवडणुकीशी निगडित खर्चही त्यांनाच करावा लागेल. स्टार प्रचारकाचा खर्च हा पक्ष करीत असतो आणि तो अमर्यादित असू शकतो. आता कमलनाथ यांचा हा दर्जाच काढून घेण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com