Supreme Court Judge Justice NV Ramana Will be the Chief Justice of India
Supreme Court Judge Justice NV Ramana Will be the Chief Justice of India

एन. व्ही. रमण होणार सरन्यायाधीश; शरद बोबडे यांनी केली शिफारस

सरन्यायाधीश शरदबोबडेहे २३ एप्रिल रोजीनिवृत्त होणार आहेत.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमण हे सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश असतील. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारकडे रमण यांच्या नावाची शिफारस केली आहे. बोबडे हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे एक महिना आधीच त्यांनी रमण यांचे नाव सुचविले आहे. 

रमण हे सरन्यायाधीश बोबडे यांच्यानंतरच सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. बोबडे हे २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार असल्याने केंद्र सरकारने सरन्यायाधीस नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना याबाबतचे पत्र पाठवले होते. त्यानुसार बोबडे यांना नवीन सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस मागविण्यात आली आहे. बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे रमण हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश असतील. 

रमण ६४ वर्षांचे असून मुळचे आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांचा जन्म पोन्नावरम या गावातील एका शेतकरी कुटूंबात झाला आहे. रमण यांनी १९८३ मध्ये वकिली सुरू केली. ते जून २००० मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी २०१४ पर्यंत ते दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर ती पूर्ववत करण्याचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांमध्ये रमण यांचा समावेश होता. 

सरन्यायाधीश बोबडे यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये शपथ घेतली होती. रंजन गोगोई यांच्यानंतर बोबडे सरन्यायाधीश बनले आहेत. अनेक महत्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये बोबडे यांचा सहभाग होता. तसेच अयोध्येतील विवादीत जागेवर राम मंदीर उभारण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांमध्येही बोबडे यांचा समावेश होता. 

दरम्यान, सरन्यायाधीश नियुक्तीच्या प्रक्रियेनुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमुर्तींची शिफारस करावी लागते. त्यांचीच निवड सरन्यायाधीश म्हणून केली जाते. सध्या रमण हे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे रमण यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश बोबडे यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com